Voice of Eastern

मुंबई:

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन राज्यभर सुरू आहे अजून देखील या आंदोलनाचा तिढा सुटलेला नाही आहे आज एसटी कामगारांचे एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेत यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या चा पाढा राज यांच्यासमोर मांडण्यात आला. राज यांनीदेखील या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देऊ व लवकरच राज्य सरकारची याबाबत बोलू फक्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, असे आव्हान राज यांनी केले. तसेच मी आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची नेतृत्व करणार नाही, आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट असेल,” असे राज एसटी कामगारांच्या काळजीपोटी म्हणाले.

गेल्या १२ दिवसांपासून राज्यात एस टी कर्मचाऱ्यांना संप सुरू आहे. या संपात जवळपास २८ संघटना सामील झाल्या असून आज एसटी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. एसटी कर्मचारी संघटनेची कर्मचारी आज राज ठाकरेंना भेटली, २८ संघटनांना बाजूला ठेवून एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. एसटी महामंडळचे विलीनीकरण करावे अशी प्रमुख मागणी आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयावर लवकरच राज ठाकरे सरकारशी बोलणार आहेत. मुख्यमंत्री हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने राज ठाकरे कोणाशी बोलणार असा प्रश्न पत्रकारांनी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना विचारलं असता बाळा नांदगावकर म्हणाले,राज साहेबांना कोणाशी बोलावं लागेल ते त्यांना आणि तुम्हाला माहीत आहे असे ते म्हणाले.

आंदोलन सुरु असल्यापासून बिन पगारी आंदोलन सुरू आहे.
विलिनीकरण संदर्भात न्यायालय ची तारीख येईल.न्यायालयाची तारीख येईल फटाके वाजतील. पण हाती कहीच आलं नाही तर काय? त्यामुळे आयोग लागू करा आणि नंतर विलिनीकरण करा अशी आमची मागणी आहे असे या कर्मचाऱ्यांनी सांगितले

Related posts

दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहात १ मेपासून रंगणार पालकमंत्री चषक क्रिकेट स्पर्धा

महिला आरपीएफ ची दमदार कामगिरी

कैटरीना कैफ बनली इतिहाद एअरवेजची ब्रँड ॲम्बेसेडर

Leave a Comment