मुंबई
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वादग्रस्त विधानानंतर आता भाजप नेत्यांकडून देखील प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरवेळी तिची बाजू घेणारे भारतीय जनता पक्षाचे नेते देखील यावेळी सावध भूमिका घेताना दिसत आहेत त्याबरोबर कोणतेही विधान करताना दिसत नाही आहे. आमदार राम कदम यांनी देखील या विधानाचे समर्थन होऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाला आहे ते हजारो नव्हे तर लाखो लोकांच्या कष्टाने त्यागाने मिळालं आहे त्यामुळे एखादं व्यक्तीचे स्वातंत्र्य संदर्भातला विधानाचे समर्थन होऊ शकत नाही असे राम कदम यांनी सांगितले. आमदार राम कदम हे काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी घाटकोपर पोलीस स्थानकात आले होते त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आम आदमी पार्टीने तिच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही पत्र लिहत देशद्रोही विधान करणारे कंगना राणावत हिचा पद्मश्री पुरस्कार परत जावा असे पत्र केंद्र सरकारला द्यावे अशी विनंती आम आदमी पार्टीच्या प्रीती मेमन शर्मा यांनी केली आहे
कंगना राणावत यांनी केलेल्या वक्तव्याचा सोशल मिडियात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अनेकांनी तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे.आपच्या मुंबई प्रभारी प्रीती मेनन यांनी विधानाची दखल घेत ५०४, ५०५ व १२४ अ या कलमाखाली देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी मुबई पोलिसांकडे केली आहे.
काय म्हणाली कंगना राणावत?
“ते स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र मिळालं आहे, ते २०१४ मध्ये मिळालं आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात कंगना राननौत म्हटलं आहे. या वक्तव्यानंतर देशभरामध्ये चीड निर्माण झाली आहे.