Voice of Eastern

मुंबई :

सध्या सुरू असलेल्या आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक नोकर्‍या दिल्याची नोंद झाली आहे. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वाधिक १ हजार ७२३ नोकर्‍यांच्या ऑफर्स विविध कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. त्यातील १ हजार ३८२ ऑफर्स विद्यार्थ्यांकडून स्वीकारण्यात आल्या. गतवर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळण्याच्या प्रमाणात घट झाली होती. त्यातुलनेत यंदा कंपन्यांकडून मोठ्या पगाराच्या नोकर्‍या विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

२०१९-२० मध्ये प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात १ हजार ३१९ विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या होत्या. त्यातील १हजार १७२ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या होत्या. त्यानंतर गतवर्षी प्लेसमेंटवर कोरोनाचे सावट दिसून आले. गतवर्षी नोकर्‍यांच्या ऑफर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. गतवर्षी १ हजार १२८ विद्यार्थ्यांना ऑफर्स दिल्या त्यातील ९७३ विद्यार्थ्यांनीच ऑफर्स स्वीकारल्या होत्या. मात्र यंदा प्लेसमेंटमध्ये उत्साह दिसून आला. देशी कंपन्यांबरोबरच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही नोकर्‍यांच्या ऑफर्स देण्यात उत्साह दाखवला. त्यामुळे यंदा मागील तीन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक १ हजार ७२३ नोकर्‍या ऑफर्स झाल्या. हा आकडा गतवर्षीच्या तुलनेत ५९५ ने जास्त आहेत. तर १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी ऑफर्स स्वीकारल्या आहेत.

आयआयटी मुंबईला यंदा अमेरिका, जपान, युएई, सिंगापूर, नेदरलँड्स, हाँगकाँग, तैवान अशा देशांतून तब्बल ४५ आंतराराष्ट्रीय कंपन्यांकडून नोकर्‍यांच्या ऑफर्स आल्या आहेत. कोरोनाच्या धर्तीवर बाजारात असलेल्या मंदीमुळे आयआयटी मुंबईच्या प्लेसमेंट कार्यालयाकडून नवीन स्टार्टअप कंपन्या आणि उद्योगांनाही आयआयटीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थ्यांना सर्वात जास्त ऑफर्स मिळाल्या आहेत. फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष २८.४० लाख इतक्या मोठ्या पगाराची ऑफर्स मिळाली असनू, ही सर्वाधिक ऑफर्स आहे. त्यानंतर आयटी/सॉफ्टवेअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, कन्सल्टिंग अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना लाखो रुपयांचे पॅकेजेस मिळाले असल्याची माहिती प्लेसमेंट सेलकडून देण्यात आली आहे.

Related posts

जे.जे. रुग्णालयामध्ये अद्ययावत उर शल्यचिकित्सा कक्ष सुरू 

Voice of Eastern

महाराष्ट्र बंद परिणाम : मुंबईत शुकशुकाट मात्र पूर्वद्रुतगती महामार्गावर गाड्यांची वर्दळ

शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल पदभरतीसाठी कार्यवाही करावी – उपमुख्यमंत्री

Leave a Comment