मुंबई
भारतीय नौदलात करियर बनवू इच्छिणार्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलात कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण शाखेसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकार्यांसाठीची भरती होत आहे. या पदांसाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी २१ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईडवर जाऊन अर्ज करायचे आहे.
इंडियन नेव्ही एस.एस.सी. ऑफिसर कोर्स २२ जून २०२२ पासून इंडियन नेव्हल अकादमी एझीमाला, केरळ येथे सुरू होणार आहे. रिक्त पदांचा तपशील एक्झिक्युटीव्ह ब्रँच जनरल सर्व्हिस [GS(X)] / हायड्रो कॅडर ४५ पदे, एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ए.टी.सी.) ४ पदे, निरीक्षक ८ पदे, पायलट १५ पदे, लॉजिस्टिक १८ पदे, शिक्षण शाखा शिक्षण १८ पदे, तांत्रिक शाखा अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा) २७ पदे, इलेक्ट्रिकल शाखा (सामान्य सेवा) ३४ पदे, नेव्हल आर्किटेक्ट (NA) १२ पदे आहेत. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रतेसाठीची आणि भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकतात. निवड प्रक्रिया प्राप्त अर्जांच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल आणि एस.एस.बी. मुलाखतीसाठी बोलावले जाईल. पात्रता पदवीच्या ५ व्या सेमिस्टरपर्यंतच्या गुणांचा विचार केला जाईल. तसेच शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना एस.एस.बी. मुलाखतीची माहिती एस.एम.एस. आणि ई मेलद्वारे दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.