दिवाळीला आखेर लक्ष्मी पावली आहे. केंद्र सरकार ने नुकतेच पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतेक याच निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयनुसार पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. नवीन दर आज मध्य रात्रीपासून लागू होणार आहे.
गेले अनेक दिवस देशभरात पेट्रोल डिझेल दरवाढीने हाहाकार झाला आहे. मात्र मंगळवारी केंद्र शासनाने सामान्य नागरिकांसाठी एक खुशखबर दिली आहे. पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी करण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोल ₹११५.८५ तर डिझेल ₹१०६.६२ या दराने विकले जात होते. मात्र ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हे दर कमी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.