Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमी

गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पात बाधक ३५ अतिक्रमणे हटवली; अतिक्रमणे हटविल्याने उड्डाणपुलासाठी जागा उपलब्ध

banner

मुंबई : 

पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणार्‍या गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) बांधकामामध्ये अडथळा ठरलेलली ३५ अतिक्रमणे पालिका वार्ड कार्यालयामार्फत कारवाई करून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली असून प्रकल्प निर्मितीलाही वेग मिळणार आहे.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी समस्या सोडवण्यासाठी गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. पालिकेच्या पी/ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी (फिल्मसिटी) रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे होती. त्यावरील ३५ अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने २१ ऑक्टोबर रोजी पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूची जागा गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.

Related posts

राणी बागेचे चार महिन्यांचे उत्पन्न अडीच कोटी

Voice of Eastern

‘आश्रय’ सिनेमाचा ट्रेलर लाँच !

३० वी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा ७ मे पासून 

Leave a Comment