Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

म्हाडा वसाहतींतील भाडेवसूली कार्यालये शनिवारी, रविवारी राहणार सुरु

banner

मुंबई :

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वसाहतींमधील सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच रहिवाशी यांच्याकडून थकीत सेवाशुल्कावरील व्याज रद्द करून सेवाशुल्क वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत थकीत वसूली पाच वर्षात १० समान हप्त्यांमध्ये करण्यात आली आहे. थकीत सेवाशुल्काचा दुसरा हप्ता भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत असून नागरिकांच्या सोयीसाठी म्हाडा वसाहतींतील भाडे वसुली कार्यालये शनिवारी आणि रविवारी सुरु ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अभय योजनेचा जास्तीत जास्त म्हाडा सदनिका धारकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले असून थकीत सेवाशुल्काचा भरणा रहिवाशांना मुदतीत करता यावा, तसेच नियमित मासिक सेवाशुल्काचाही भरणा करता यावा, यासाठी २६ मार्च आणि २७ मार्चला मुंबई मंडळातर्फे संबंधित मिळकत व्यवस्थापक यांच्या कार्यक्षेत्रातील भाडेवसूली कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत. सेवाशुल्क भरण्याकरिता ई-बिलिंग संगणकीय प्रणाली कार्यरत असून म्हाडा वसाहतीतील गाळेधारकांना घरबसल्या सेवाशुल्कही भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई मंडळाच्या अखत्यारीत ११४ अभिन्यास असून ५६ हून अधिक वसाहती आहेत. या वसाहतींना म्हाडातर्फे ज्या सेवा पुरविल्या जातात, त्यापोटी या वसाहतींमधील रहिवाशांकडून सेवाशुल्क आकारले जाते. सेवाशुल्क आकारणीच्या बदल्यात म्हाडा पंप हाऊसची देखभाल, पंप चालकाचे वेतन, टँकर्सची आपत्कालीन दुरुस्ती, स्वच्छता कर्मचार्‍यांचे वेतन, स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य इत्यादीसारख्या सुविधा मंडळातर्फे पुरविल्या जातात.

Related posts

मुलुंड जकात नाक्यावर अडवला सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Voice of Eastern

युवा महोत्सवात एसएनडीटी कॉलेज आणि एससीबी कॉलेजचा विजय

अरबी समुद्रात पुन्हा वादळ; गुजरातच्या नौका आगरदांडा-दिघी बंदराकडे

Leave a Comment