Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

न्यायालयाच्या निर्णयाचा राज्यातील निवासी डॉक्टरांकडून निषेध

banner

मुंबई :

कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. त्यात आता न्यायालयाच्या निर्णयाने अधिकच भर पडली आहे. पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन फेरी राबविण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ६ डिसेंबरपर्यंत प्रलंबित ठेवला आहे. एकीकडे कोरोनाचा ओमायक्रॉन हा नव्या विषाणू घातक ठरत असताना न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक डॉक्टर रुग्णसेवेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी देशातील निवासी डॉक्टरांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत.

देशामध्ये अद्यापही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनामुळे सलग २० महिन्यांपासून डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यातच आरोग्यसेवेतील अनेक तुटींमुळे डॉक्टरांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. देशातील सर्व सरकारी रुग्णालयात आवश्यक असलेल्या डॉक्टरांच्या संख्येच्या तुलनेत फक्त दोन तृतीयांशच डॉक्टर आहेत. हे डॉक्टर मागील ८ महिन्यांपासून सर्वसामान्य तसेच कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. अपुऱ्या संख्येने डॉक्टर अनेक महिन्यांपासून कोरोनाचा सामना करत आहेत. त्यातच आता एमबीबीएसचे (MBBS) शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी (POST GRADUATION) अनेक डॉक्टर तयार झाले आहेत. या डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी आवश्यक असलेली ‘नीट’ (NEET) प्रवेश परीक्षा (ENTRANCE EXAM) दिली आहे. या प्रवेश परीक्षेची समुपदेशन फेरी (counseling) राबवण्याबाबतचा निर्णयाला न्यायालायत आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भात नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने खटला प्रलंबित ठेवत ६ जानेवारी २०२२ ला पुढील सुनावणी ठेवली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सध्या कोरोना योद्धे (COVID warriors) म्हणून काम करत असलेल्या निवासी डॉक्टरांवर (resident doctors) प्रचंड ताण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध देशांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने (Omicron) धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांवर पडणार ताण लक्षात घेऊन न्यायालयाने ‘नीट’च्या पदव्युत्तर समुपदेशन (NEET PG counseling) फेरीबाबत फास्टट्रॅक पद्धतीने निर्णय घ्यावा यासाठी देशातील निवासी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात आता मुंबईतील केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. केईएम, नायर आणि सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी रविवारी महालक्ष्मी येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) कार्यालयाच्या परिसरात आंदोलन केले. तसेच न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी सोमवारपासून ते काळी फित लावून काम करणार आहेत.

आपल्या देशात स्टारपुत्रासाठी मध्यरात्रीपर्यंत न्यायालय सुरू राहते. पण देशाचे भविष्य सुरक्षित करणारे आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नसल्याची खंत डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Related posts

शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची शैक्षणिक महासंघाची यूजीसीकडे मागणी

दंतवैद्यकांनी प्रोस्थोडोंटिक वॉकथॉनमधून ‘लेट स्माईल, गो माईल्स’चा दिला संदेश

Voice of Eastern

४८ वी कुमार – मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खोखो स्पर्धेत उस्मानाबाद, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, सांगली बाद फेरीत

Leave a Comment