Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर

banner

मुंबई :

मुंबई विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या हिवाळी सत्राच्या पारंपारिक वाणिज्य विद्याशाखेच्या तृतीय वर्षाच्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर झाला. ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या बीकॉमच्या परीक्षेचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे.

बीकॉम सत्र ५ परीक्षेला ६९ हजार ३७९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८ हजार ९९१ इतके विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर ३८८ जण अनुपस्थित होते. बीकॉम सत्र ५ च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६४ हजार ८५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ४१४१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेचा निकाल मुंबई विद्यापीठाच्या  http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत हिवाळी सत्रातील ११९ परीक्षांचे निकाल जाहीर केले आहेत. तृतीय वर्षाच्या बीकॉम सत्र ५ प्रमाणे विद्यापीठाने बीएस्सी  सत्र ६ (७५:२५) व बीएड (स्पेशल एज्युकेशन) एएसडी सत्र २ असे तीन निकाल शनिवारी जाहीर केले आहेत.

Related posts

उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानमध्ये न जाण्याचा भारतीय विद्यार्थ्यांना सल्ला

मुंबई, ठाण्यातील २५० मेडिकल स्टोअर्स फार्मसिस्टविना

Voice of Eastern

रीताभरी चक्रवर्तीच्या ‘नंदिनी’चे पोस्टर आऊट

Leave a Comment