Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

रक्त कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी स्टेम सेल प्रत्यारोपणाची संजीवनी

banner

मुंबई : 

दरवर्षी, भारतातील एक लाखाहून अधिकलोकांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान होते, लहान मुलांच्या कॅन्सरने होणाऱ्या मुत्यूमध्ये रक्ताच्या कर्करोग हे प्रमुख कारण आहे. ब्लड कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर स्टेम सेल प्रत्यारोपणाने उपचारकरता येऊ शकतात, हे अनेकांना माहीत नसते.

पॅट्रिकपॉल, सीईओ, डीकेएमएस-बीएमएसटी, म्हणतात, “दर ५ मिनिटाला भारतातील एका व्यक्तिला ब्लडकॅन्सर किंवा रक्ताचा विकार झाल्याचे निदान होते. बर्‍याच रुग्णांसाठी, जुळणार्‍या रक्त स्टेम सेलदात्याचा शोध ही काळाच्या विराधातील शर्यतीची सुरुवात असते. प्रत्यारोपणाच्या सुविधेसाठी जुळणारा दाता शोधण्यात वांशिकता महत्त्वाची भूमिका बजावते, कारण रुग्णांना त्यांच्यास्वतःच्या वंशातील व्यक्ती दाता म्हणून जुळण्याची शक्यता असते. आमेच लक्ष्य शक्य तितक्या स्टेमसेल दात्याची नोंदणी करण्यावर असते. आतापर्यंत, (डीकेएमएस-बीएमएसटी, ) DKMS-BMST ने ८० हजारहून अधिक संभाव्य देणगीदारांची नोंदणी केली आहे. ७५ रुग्णांना जीवनाची दुसरी संधी मिळवून देण्यात मदत केली आहे.”

कोकिलाबेनधीरुभाई अंबानी हॉस्पिटल, अंधेरी मुंबई येथील हेमॅटो ऑन्कोलॉजिस्ट, बोन मॅरो ट्रान्सप्लांटतज्ज्ञ डॉ. संतनु सेनयांनी माहिती दिली की, स्टेमसेल नोंदणी अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी संभाव्य स्टेम सेल दात्यांचा स्त्रोतनोंदणीकृत करून रक्त कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. अस्थिमज्जा प्रत्यारोपण, ज्याला स्टेम सेल प्रत्यारोपण म्हणूनही ओळखले जाते, हा एक असा उपचार आहे जो रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केल्यास आणि रुग्णाची शारीरिक स्थिती चांगली असल्यास रक्ताचा कर्करोग बरा होऊ शकतो. प्रत्यारोपणाचे यश हे रुग्णासाठी अनुवांशिकता जुळणारा योग्य दाता शोधण्यावर अवलंबून असते. भारतात सर्वात मोठी समस्या अशी आहे की नोंदणी केलेल्या देणगीदारांची संख्या अजूनही तुलनेने कमी आहे. स्टेमसेल प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रूग्णांसाठी योग्य जुळणी शोधण्याची शक्यता वाढवण्यासाठी रजिस्ट्री त्यांच्या डेटाबेसवर देणगीदारांची संख्या सतत वाढविण्यावर अविरत काम करत आहेत. आणखी एक महत्त्वाची समस्या अशी आहे की प्रक्रियेबद्दल अतार्किक भीतीमुळे संभाव्य जुळणी पडताळणी झाल्यानंतरही स्टेम सेल (पेशी) दान करण्यास अजूनही तेवढा प्रतिसाद मिळत नाही. स्टेमसेल दाता बनणे ही तुलनेने सोपी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे आणि यामुळे ल्युकेमियाग्रस्त व्यक्तीच्या जीवनात खूप मोठा सकारात्मकबदल घडवला जाऊ शकतो.

वर्ल्डमॅरो डोनर असोसिएशननुसार, स्टेमसेल डोनर सेंटर्स ने केलेल्या नोंदणीनुसारजगभरात ४० दशलक्षाहून अधिक संभाव्य डोनर्स सूचीबद्ध आहेत, त्यापैकी फक्त ०.०४ टक्के भारतीय आहेत. भारतत वैविध्यपूर्ण वांशिकता आहे. समान वांशिकपार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये समान HLA ऍलेल्स असण्याची शक्यता जास्त असते. त्यामूळे संभाव्य डोनर्सची नोंदणी वाढवण्याची गरज आहे. पण रक्त कर्करोगाचा मोठा धोका असतानाही, भारतात प्रौढ रक्तदात्यांची पुरेशी नोंदणी नाही. याचे कारण स्टेमसेल प्रत्यारोपणाबद्दल जागरूकता नसणे आणि स्टेम सेल डोनर बनण्याबद्दलचे अनेक गैरसमज. डेटाबेसमध्‍ये भारतीय दात्यांची संख्‍या वाढवल्यास एचएलए विविधतेच्या डेटा पूलमध्‍ये भर पडेल, त्यामुळे योग्य जुळणीचा दाता मिळण्याची शक्यता वाढेल.

Related posts

तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांची ही भन्नाट आयडिया!

Voice of Eastern

केईएममधील शवागृह २४ तास खुले राहणार

ट्रू- व्होटर मोबाईल ॲपवर शोधता येणार मतदार याद्यांमधील नावे

Leave a Comment