Voice of Eastern

मुंबई :

प्रामाणिकपणे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रबंध वाङ्मयचौर्य रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून कायदे बनवण्यात येत असले तरी मुंबई विद्यापीठाकडून प्रबंध वाङ्मयचौर्य करण्यार्‍याला विभाग प्रमुखालाच पाठीशी घालण्यात येत आहे. वाङ्मयचौर्य, छळवणूक यासदंर्भात विद्यार्थी व प्राध्यापकांकडून तक्रारी आल्यानंतर संबंधित विभाग प्रमुखाची चौकशी करण्याऐवजी विद्यापीठाने त्याकडे दुर्लक्ष करत त्याला रान मोकळे करून दिले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील संशोधनाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मुंबई विद्यापीठामध्ये इतिहास विभागाच्या प्रमुखपदी असलेले डॉ. संदेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झालेले अनेक प्रबंध हे यापूर्वी दाखल झालेल्या प्रबंधांची हुबेहूब नक्कल आहे. जुन्या प्रबंधामधील सर्वेक्षण डेटा व त्यांची मांडणी तसेच तळटीपामधील टंकलेखनाच्या चुकांसह नव्या प्रबंधामध्ये जसाच्या तशा नक्कल करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या प्रबंधांचे शीर्षक बदलून त्यांनी ते संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. २००७ मध्ये ‘डॉ.बी. आर. आंबेडकर आणि समता सैनिक दल एक अभ्यास (१९२७-१९५३)’ २०१६ मध्ये ‘कोकण विभागातील अनुसूचित जाती समूहाचा इतिहास (१९००-१९९०)’ हे प्रबंध सादर करण्यात आले होते. डॉक्टर वाघ यांनी याच प्रबंधाचे नाव ‘समता सैनिक दलाच्या कोकणातील कार्याचा अभ्यास’ हा प्रबंध २०१८ मध्ये सादर केला. या प्रबंधातील १३७ पृष्ठ संख्यामधील ८५ पृष्ठे हे यापूर्वीच्या प्रबंधातून नक्कल केलेली आहेत. त्याचप्रमाणे २०१७ मध्ये सादर झालेला ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्माविषयक दृष्टीकोण’ हा प्रबंध २०२१ मध्ये ‘बाबासाहेब आंबेडकरांची बौद्ध धम्माविषयी लेखन व भाषणे यांचा चिकित्सक अभ्यास’ या नावाने विद्यार्थ्याकडून सादर करण्यात आला. या प्रबंधातील ४४ पृष्टे जशीच्या तशी पूर्वीच्या प्रबंधातून घेतलेली आहेत. तलासरी ‘तालुक्यातील वारली आदिवासी’ या विषयावरील प्रबंधामध्ये ‘तलासरी’ शब्दाऐवजी ’दीव दमण’ हा शब्द वापरून प्रबंध वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आला आहे. विद्यापीठात रुजू झाल्यापासून सहा वर्षात डॉक्टर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ९ पीएचडी आणि १२ एम.फिल.पदवी देण्यात आल्या आहेत.

वाघ हे वाङ्मयचौर्याबरोबरच पदाचा दुरुपयोग, संशोधक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत असल्याच्या तक्रारी जून २०२१ मध्ये इतिहास विभागाचे माजी विभाग प्रमुख किशोर गायकवाड यांनी कुलगुरूंकडे केल्या होत्या. वाङ्मयचौयर्र्सारख्या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन विद्यापीठाने तात्काल चौकशी समिती नेमून कारवाई करणे अपेक्षित असतानाही वर्षभरापासून विद्यापीठाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पीएचडी प्रबंध वाङ्मयचौर्र्याला विद्यापीठाचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.

वाघ स्वत: सादर करायचे प्रबंध

डॉ. वाघ आपल्या खाजगी टंकलेखककाद्वारे अनेक विद्यार्थ्यांचे प्रबंध टाईप करून स्वतः विभागात जमा करत होते. यापैकी अनेक प्रबंध मराठीत असून युनिकोड फॉन्टमध्ये नसल्याने वाग्मयचौर्य अन्वेषण सॉफ्टवेअरमध्ये हा डेटा आढळून येत नाही. विद्यापीठाच्या अध्यादेशानुसार मार्गदर्शकालावाङ्मयचौर्य नसल्याचे हमी प्रमाणपत्र द्यायचे असते. असे प्रमाणपत्र देऊन डॉ. वाघ यांनी गंभीर गुन्हा केला आहे.

Related posts

कूपर रुग्णालयात अर्धांगवायूग्रस्त दोन रुग्णांवर चार तासांत यशस्वी शस्त्रक्रिया

Voice of Eastern

सेव्हन हिल्स रुग्णालयात रक्तशुद्धीकरणासह १०० खाटांचे अतिदक्षता विभाग

गोवरची साथ : तुमच्या मुलाच्या डोळ्यांचे संरक्षण कसे करावे

Voice of Eastern

Leave a Comment