Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

रोचीराम थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळेतील कर्णबधीर विद्यार्थांना रस्ता सुरक्षेतेचे धडे

banner

चेंबूर :

रोचीराम थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळेत कर्णबधीर विद्यार्थांसाठी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर ऑर्गनायझेशनचे महासमादेशक अनील कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत नव्या रस्ता सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन कोल्हापूर यांचे युनिट सुरू करण्यात आले आहे. यावेळी मुंबई समाज कल्याण खात्याचे सह आयुक्त प्रसाद खैरनार, मुंबई विभागीय समादेशक सुभाष मोरे, संस्थेचे संस्थापक सदस्य अमोघसिद्ध पाटील, आरएसपी शिक्षक अधिकारी कुंतला चौधरी, रत्नश्री जाधव, पपन साहेजा आदी सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शाळेतील कर्णबधीर विद्यार्थ्यांनी संचलन केले व 3 डी मॉडेल तयार करून उपस्थितांची मने जिंकली. शाळेतील आरएसपी अधिकारी विलास पंडीत यांना स्पेशल स्कूल युनिट अध्यक्ष तर संजय पिंपळे यांना स्पेशल स्कूल मुंबई युनिटचे सचिव या पदावर नेमणूक करण्यात आली. सुरू करण्यात आलेल्या कार्यशाळेत काणे यांनी उपस्थित अधिकारी वर्गाने विद्यार्थांच्या रोजच्या जीवनात रहदारीचे कोणते नियम पाळणे आवश्यक आहे. रस्त्यावर चालताना घ्यायची काळजी त्याबद्दल मार्गदर्शन केले. मुंबई विभागीय समादेशक सुभाष मोरे यांनी हा उपक्रम विविध शाळांमध्ये सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला. समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी आम्ही जीवनावश्यक कौशल्ये देणारे उपक्रम राबविण्यासाठी उत्सुक असून आमच्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी आश्वासन दिले. यावेळी भाग्यश्री वर्तक यांच्या शुभ्रा प्रकल्पातर्फे विद्यार्थांना किटचे वाटप करण्यात आले.

साधरण वर्षभरापूर्वी सुनील रावत व वीआयए संस्थेमार्फत या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आमची मुले कर्णबधीर असून सुद्धा या उपक्रमात मनापासून सहभागी झाले आहेत. माझी शाळा हा उपक्रम राबवणारी महाराष्ट्रातील प्रथम विशेष शाळा आहे, याचा अभिमान वाटतो.
– भाग्यश्री वर्तक, मुख्याध्यापक, रोचीराम थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप शाळा

Related posts

३३ वर्षीय व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण यशस्वी; आशियातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली

शिक्षक-पदवीधर मतदारसंघात नोंदणीला ऑनलाईनचा पर्याय द्या – भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे ते औरंगाबाद अंतर आता सव्वा तासात होणार पार

Leave a Comment