मुंबई :
अभिनेते आर. माधवन यांनी वर्गीस मूलन फाऊंडेशनशी सहकार्य करून जन्मजात हृदयविकाराच्या समस्या असलेल्या 60 मुलांचे जीवन बदलून टाकण्यासाठी हृदय शस्त्रक्रियेची सोय करण्यात आली आहे हा उदात्त उपक्रम ” रॉकेटरी: द नंबी इफेक्ट” या चित्रपटाच्या टीम ने केला आहे.
चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार साजरा करण्यासाठी रॉकेट्री निर्माते वर्गीस मूलन आणि विजय मूलन यांनी एक उदात्त प्रयत्न सुरू केला. त्यांनी केरळमधील वंचित मुलांसाठी 60 हून अधिक हृदय शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा उपक्रम केला असून यातून अनेकांचे जीवन उजळणार आहे.
7 ऑक्टोबर रोजी कोचीच्या अंगमाली येथील अॅडलक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये याची घोषणा झाली.
” रॉकेटरी: द नंबी इफेक्ट” ने सर्वोच्च राष्ट्रीय मान्यता मिळवली असून अभिनेता आर. माधवन यांच्यासाठी हा एक हृदयस्पर्शी क्षण होता.