मुंबई :
आक्षेपार्ह मजकूर असलेली आयुर्वेदिक औषधे विक्रीस ठेवल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)भिवंडी आणि दहिसरमधील रिलायन्स रिटेल लिमिटेड या दुकानातून छापा घालून सहा हजार सहाशे रुपयांचा आयुर्वेदिक औषध साठा जप्त केला. ही औषधे आजारांबाबत दिशाभूल देणार्या माहितींसह विकली जात होती, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लैंगिक शक्तीवर्धक, महिलांच्या मासिक पाळीसंबंधी आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब, सुडौल बांधा-शरीरयष्टी, श्वशन विकार-अस्थमा, अनिद्रा या आजांरावर उपयुक्त असल्याचा दावा करणारा मजकूर असल्याची औषधांची विक्री रिलायन्सच्या भिवंडी येथील रिटेल शॉपमध्ये होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार भिवंडीतील रिलायन्स रिटेल शॉपवर एफडीएने छापा घातला. या छाप्यामध्ये त्यांना विविध प्रकारची दिशाभूल करणारा मजकूर असलेली २० प्रकारची औषधे आढळली. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर याच दुकानातून दहिसर येथील रिटेल शॉपमध्येही औषधे पाठवण्यात आल्याचे कळले. त्यानुसार दहिसरमधील रिटेल शॉपवरही धाड टाकण्यात आली. या शॉपमध्ये एफडीएकडून १४ आयुर्वेदिक उत्पादने जप्त करण्यात आली. औषधांवर असलेला मजकूर हा औषधे व जादूटोणादी उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४, कलम ३ व ४ च्या तरतूदींचे उल्लंघन असल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली.
जप्त करण्यात आलेली औषधे :
बैद्यनाथ सुंदरी सखी सिरप, कापीवा करेला जामून जूस, कापीवा विगोर मॅक्स ज्यूस, लामा श्वास कुठार ज्यस, प्रविक मेमोडीन टॅबलेट, रीफवे नाईट विनर कॅप्सूल, रीफवे पावर सोर्स कॅप्सूल, रीफवे पावर ऑफ बिग कॅप्सूल, रीफवे पावर ऑफ डिक कॅप्सूल, रीफवे प्रो विगोर कॅप्सूल, रीफवे पुअर शिलजित कॅप्सूल, रिफवे रिअल मूड कॅप्सूल, रीफवे एसएक्स फुअल कॅप्सूल, रीफवे एसएक्स प्लेयर कॅप्सूल, रिफवे सफेद मसुली कॅप्सूल, रिफवे मुसली पावडर कॅप्सूल, रिफवे सेक्स बुस्टर कॅप्सूल, रिफवे सेक्स बुस्टर पावडर, बैद्यनाथ बसंत कुसुमाकर रस टॅबलेट, मेडिलेक्सिक अस्थालेक्स ड्रॉप, डॉ जॉन्स रुमाटोन प्लस सायरप, मेडिलेक्सिक कार्डिओलेक्स ड्रॉप, पॉवेल रुमोप्लेक्स सायरप, लॉर्डस बिपी फोर्ट ड्रॉप, जॉन्स डायनिस टॉनिक, जॉन्स बोझेम प्लस टॉनिक, पॉवेल डायबेटीन सिरप, लॉर्डस हाइट अप टॅलबेट, पॉवेल फेमोलेक्स टॉनिक, लॉर्डस कँल्कुली सिरप, लॉर्डस लुको आर सायरप, पॉवेल इंसोम्बिना सायरप, पॉवेल कार्डीओप्लेक्स हार्ट टॉनिक