सैन्यदलातील जवानांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झालेला असताना समाजातील विविध संस्थांनी एकत्र येऊन पुण्यामध्ये २७ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले. श्री. महावीर जैन हॉस्टेल येथे पार पडलेल्या या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १६५ जणांनी या शिबिरात सैन्यदलासाठी रक्तदान केले.
गिरिप्रेमी, स्वरुपसेवा, लव्ह केअर शेअर फाऊंडेशन, श्री. महावीर जैन विद्यालय, विद्या व्हॅली शाळा, गिरिकुजन, गार्डीयन गिरिप्रेमी पर्वतारोहण संस्था आणि डिफ्रंट स्ट्रोक्स या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले हे रक्तदान शिबिर आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या (AFMC) सहकार्याने पार पडले. शिबिराच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून कोरोना काळात रक्त आणि प्लाजमासाठी जनजागृतीचे काम केलेल्या ब्लड फॉर पुणे टीम, जागृती सायचीत आणि प्रकाश ढमढेरे यांचा सन्मान करण्यात आला. रक्तदानाच्या अखेरीस AFMC च्या डॉक्टरांनी सर्व संस्था व रक्तदात्यांचे आभार मानले.