Voice of Eastern
पूर्व उपनगर

एकट्या अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे पण उद्या हजारो मनसे कार्यकर्ते ठाण्यात जमतील त्याचं काय, मनसेचा इशारा

banner

मुंबई

मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर दहीहंडी उत्सवासाठी बांधण्यात आलेला व्यासपीठ काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईनंतर मनसे आक्रमक झाली आहे. आम्ही दहीहंडी साजरी करणारच यावर मनसे ठाम आहे. आज एकट्या अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे पण उद्या हजारो मनसे कार्यकर्ते ठाण्यात जमतील त्याचं काय करणार आम्हाला पण बघायचे की मनसे कार्यकर्त्यांना कशाप्रकारे ताब्यात घेतात असा इशारा देशपांडे यांनी राज्य सरकारला दिला आहे.

यावर्षी देखील दहीहंडी वरती निर्बंध लावण्यात आलेले आहे. दहीहंडी साजरा करू नका असे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र मनसेने आम्ही दहीहंडी साजरी करणार अशी भूमिका घेतली होती. ठाण्यामध्ये मनसे नेते अविनाश जाधव यांनी जोरदार तयारी केली होती. काल त्यांना नोटिसा देखील देण्यात आल्या होत्या मात्र यानंतरही त्यांनी काम सुरू ठेवले होते. आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र कारवाई केली तरी आम्ही दहीहंडी साजरी करणार यावरती मनसे नेते ठाम आहेत.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी देखील ट्विट करत आम्ही दहीहंडी साजरी करणारच असा इशारा दिलेला आहे.आदेश राजसाहेबांचा… हिंदू सण साजरे होणारच…यंदाची दहीहंडी दणक्यात उत्सव संस्कृतीचा, सोहळा परंपरेचा.
चलो ठाणे असे ट्विट खोपकर यांनी केले आहे

भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना महा विकास आघाडीला हिंदू सणावरून घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे दहिहंडी बाबत मनसेची भूमिका मंदिर उघडण्यावरून मनसे आक्रमक झाली आहे. यामुळे राज्यात सरकारची डोकेदुखी मात्र वाढली आहे

 

 

 

Related posts

राज्यात १७ लाख तर, मुंबईत १ लाख ७० हजार नव्या मतदारांची भर

Voice of Eastern

होमिओपॅथीसह गोवरविरोधात लढा; मॉर्बिलीनम २०० ठरते प्रभावी

‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’मध्ये हुल्लडबाजांचा गोंधळ

Voice of Eastern

Leave a Comment