Voice of Eastern

मुंबई

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विषय दिवसेंदिवस आणखी चिघळताना दिसत आहे. पगारवाढ देऊन सुद्धा काही कामगार संघटना आंदोलनावर ठाम आहेत. या प्रकरणावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील भाष्य केले आहे. संप सुरु करणारे दोन्ही नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलन थांबवायचा निर्णय घेत असतील तर कुठं थांबायचं हे त्यांना समजत असेल तर त्यांचं स्वागत करतो, असं संजय राऊत म्हणाले. संप मागं घेण्याची भूमिका असेल तर चांगलीच आहे असेही राऊत म्हणाले. यावेळी राऊत यांनी पडळकर यांच्यावर टीका देखील केली आहे.

कामगारांचे नुकसान करत आहे

परिवहन मंत्री आहे यांनी सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. यावरती तोडगा शोधून त्यांनी या कर्मचाऱ्यांना एक चांगला पॅकेज दिला आहे. 5 हजार रुपये पगार वाढले आहेत.
त्याला पाठबळ देणारे काही राजकीय पक्षात संप ठेवणार असेल तर ते या कामगारांचे नुकसान करत आहे असं करू नका या कामगारांचे तुम्हाला गिरणी कामगार करायचा आहे का असा सवाल देखील राऊत यांनी विरोधकांना विचारला आहे. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री, आम्ही सगळे लोक कामगारांच्या बाबतीत संवेदनशील आहोत असेही राऊत म्हणाले.

यांची लायकी काय आहे?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता या विधानाचा देखील संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे.कामगार समजुतीनं घेत आहेत, पण एक विशिष्ट वर्ग या राज्यातील, देशातील वरिष्ठ आणि सन्माननीय नेत्यांविषयी एकेरी भाषेत उल्लेख करत होते. यांची लायकी काय आहे? हे कोण लागून गेले?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

Related posts

शिंदे-फडणवीस यांचे दोन चाकी स्कुटर सरकार – महेश तपासे

गिरिप्रेमीचाचा गिर्यारोहक जितेंद्र गवारे याला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर

जे. जे. रुग्णालयासह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय रूग्णालयांमध्ये डॉक्टरांचा घंटानाद

Voice of Eastern

Leave a Comment