Voice of Eastern

मुंबई

कोरोनाची रुग्णसंख्या महाराष्ट्र पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झालेली आहे यामूळे चिंतेचे वातावरण सध्या राज्यात निर्माण झाले आहे. अनेक राजकारणी देखील कोरोनाबाधित झाले आहे. आज शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राऊत यांच्या घरी चार जणांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यांच्या आई त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतणीला कोरोना ची लागण झाली आहे . घरातील सदस्यांना सर्दी ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळून आली होती त्यामुळे या सर्वांची टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये हे चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांना सौम्य लक्षणे असल्यामुळे सध्या तरी होम क्वारनटिन करण्यात आलेलं आहे. राऊत हे मुंबईत नसून ते सध्या गोवा येथे आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राऊत गोव्यामध्ये बैठका घेत आहेत.

कोरणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामध्ये राज्यातील आमदार आणि मंत्र्यांची संख्या देखील मोठी आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, के. सी. पाडवी आणि प्राजक्त तनपुरे यांच्यासह इतर सहा मंत्र्यांचा समावेश आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही करोना संसर्ग झाला आहे. तब्बल सत्तर आमदार व १२ मंत्री वेगवेगळ्या पक्षातले जवळपास ७० आमदार सध्या करोनाबाधित आहे.

Related posts

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता यांना डॉक्टरांचा घेराव

मुख्यमंत्र्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एसएनडीटी महिला विद्यापीठाचा उद्या १०८ वा वर्धापन दिन

Leave a Comment