- भांडुप
बेळगाव महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एक हाती सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत। महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रात देखील भाजपचे कार्यकर्ते साजरा करत आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला सुनावले आहे. एकीकरण समिती मराठी माणसांची प्रातिनिधीक संघटना आहे. या संघटनेचा पराभव झाला म्हणून काही लोक महाराष्ट्रात पेढे वाटत आहेत. मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता. लाज वाटत नाही असे राऊत म्हणाले.
बेळगाव महाराष्ट्रात यावा या मागणीसाठी शेकडो मराठी बांधवांचा बळी गेला. महाराष्ट्रातील 69 लोकं मेली. बाळासाहेब तुरुंगात गेले. अन् तुम्ही पेढे वाटता मराठी माणूस हरल्याबद्दल? लाज नाही वाटत नाही तुम्हाला असे म्हणत राऊत यांनी भाजपला फटकारले आहे. सातारा, सांगली कोल्हापुरातून फोन येत आहेत. तुम्ही पेढे वाटता. ठिक आहे तुमचा पक्ष जिंकला असेल मराठी माणसाच्या एकजुटीचा पराभव झाला. जे पेढे वाटतात त्यांना मराठी माणसं माफ करणार नाही, असं राऊत म्हणाले.
मराठी माणसाचा पराभव कोणी घडवला
बेळगावमध्ये मराठी माणसाची सत्ता स्थापन येईल अशी आम्हाला खात्री होती. पराजय हे दुर्दैवी जरी असलं, तरी यामागे किती कारस्थान झालं असेल, याची कल्पना करवत नाही. कर्नाटक सरकारने मराठी माणसाचा पराभव घडवून आणण्यासाठी कट केला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तोंडात बोळकं का कोंबलं होतं?
ना गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन हे देखील बेळगावातील मराठी संघटनांच्या पाठिशी कसे राहिले, त्याचं देखील उदाहरण दिलं. “जर तुमचा भगवा तिथे खरंच असेल, तर कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा उतरवला तेव्हा तुमच्या तोंडात बोळकं का कोंबलं होतं? असा सवाल भाजपला विचारला आहे.