Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

मुंबईसह राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी ‘सातारा पॅटर्न’

banner

मुंबई :

साताऱ्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी प्रायोगिक तत्वावर राबवलेल्या पायलट प्रोजेक्टमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसला आहे. अवघ्या चार महिन्यांत यशस्वी झालेला हा प्रोजेक्ट आता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार ५४८ गुन्हे दाखल झाले आहेत. यात अनेक घटनांमध्ये परिचितांकडूनच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारने अधिवेशनात ‘शक्ती’ विधेयक मंजूर केले. मात्र कायदा करण्याबरोबरच महिला सक्षम करण्यावरही सरकारकडून भर देण्यात येणार आहे. त्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी सताऱ्यामध्ये राबवलेल्या पायलट प्रोजेक्ट आता संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. यामध्ये पोलीस महिला प्रशिक्षकांकडून महिलांना संरक्षण कसे करायचे याबाबतचे धडे देण्यात आले. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत झाला. यामुळे कॉलेज आवार, कॅन्टीन, सार्वजनिक ठिकाणी गुन्ह्याला आळा बसला आणि महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली.

राज्यात २०२०-२१ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या गुन्हयांतील दोषसिद्धीचे प्रमाण ५७.६२ टक्के आहे. यामध्ये मुंबईतील गुन्ह्यांच्या दोषसिद्धीचे प्रमाण ३२ टक्के आहे. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्हयांतील दोषसिद्धीच्या प्रमाणात मागील कालावधी पेक्षा सन २०२०-२१ मध्ये सुधारणा झालेली आहे.

Related posts

मुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आयडॉलच्या प्रवेशास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

गाळ काढलेल्या नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये : प्रशासनाकडून आवाहन

Leave a Comment