मुंबई :
राज्यात आता स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करणे तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. आता शाळांना अर्ज हे ऑनलाइन करावे लागणार आहे. याबाबत शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी केले असून ऑनलाइन अर्ज आला तरच शाळांना मान्यता मिळणार आहे.
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित अधिनियमाअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर नवीन शाळा स्थापन करण्यासाठी तसेच विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासंदर्भात अर्ज करण्याकरीता ऑनलाईन संगणकिय प्रणाली (पोर्टल) तयार करण्यात आले आहे. विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्यासाठी शासनाकडून इरादापत्र मिळणेसाठी ऑनलाईन पध्दतीने https://mahasfs.org या संकेतस्थळावर नियमित अर्ज करावे लागणार आहेत. संकेतस्थळावर ऑनलाईन प्राप्त झालेल्या अजांची नियमानुसार छाननी करून ऑनलाईन कार्यवाही होणार आहे.
याबाबत शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षण उपसंचालकांना आदेश देत याची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. शाळा मान्यतेसाठी लागणारा कालावधी तसेच याबाबत होत असलेल्या तक्रारी आता ऑनलाइन अर्जामुळे मान्यतेचे काम जलदगतीने होईल अशी अपेक्षा संस्थाचालकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष फेरीचे वेळापत्रक जाहीर