मुंबई :
जगातील काही देशांमध्ये आणि मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये मायक्रोनचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईची एकूण लोकसंख्या आणि या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने कोरोना आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातील इयत्ता १०वी व १२ वीचे वर्ग वगळता इयत्ता पहिली ते ९ वी आणि ११ वी चे वर्ग असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा ४ जानेवारीपासून बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या शाळा ३१ जानेवारीपर्यंत प्रत्यक्षरित्या बंद ठेवण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचे यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरू राहणार आहे वर्ग सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान 15 ते 18 वर्षे वयोगटात वयोगटातील मुलांचे लसीकरण नियोजनानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळा बरोबरच अन्य खाजगी शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलता येईल, अशी सूचना मुंबई महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.