Voice of Eastern
गुन्हेताज्या बातम्यामोठी बातमीसायन- चुनाभट्टी-जीटीबी नगर

सायनमधून वर्षातील सर्वाधिक अंमली पदार्थांचा साठा जप्त; मानखुर्दमधील महिलेकडून ७ किलो २०० ग्रॅमचे २१ कोटींचे हेरॉईन ताब्यात

banner

मुंबई : 

मुंबईमध्ये एनसीबीकडून सध्या अंमली पदार्थविरोधी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असताना मुंबई पोलिसांच्या घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सायनमधून तब्बल सात किलो २०० ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला याची किंमत २१ कोटीं ६० लाख रुपये इतकी असून, या प्रकरणी अमीना हमजा शेख ऊर्फ लाली (५३) या महिलेला अटक केली आहे. हे ड्रग्ज राजस्थानच्या चित्तोडगड आणि प्रतापगड येथून मुंबईत आणण्यात आले होते.

राजस्थानच्या चित्तोडगढ आणि प्रतापगढ येथून मोठ्या प्रमाणात मुंबई शहरात हेरॉईनचा साठा येत असून त्याची ड्रग्ज पेडलरच्या मदतीने विक्री होत आहे. नुकताच एका महिलेने कोट्यवधी रुपयांचा हेरॉईनचा साठा मुंबईत आणला असून, त्याची लवकरच विक्री होणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या महिलेचा शोध पोलिसांनी सुरू केला होता. शोधमोहीमेदरम्यान घाटकोपर युनिटच्या पथकाने शीव-कोळीवाडा, वडाळा ट्रक-टर्मिनस रोडच्या न्यू ट्रॉन्झिंट कॅम्प, म्हाडा चाळ परिसरातून अमीना शेख ऊर्फ लाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिच्याकडे पोलिसांना सात किलो दोनशे ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत २१ कोटी ६० लाख रुपये आहे. लाली ही मानखुर्द येथील लल्लुपार्क कंपाऊंड परिसरात राहते. हेरॉईन बाळगल्याप्रकरणी लालीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिला अटक केली. अटकेनंतर तिला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

राजस्थान येथील दोन व्यापार्‍याकडून हेरॉईनचा साठा विकत घेतल्याची कबुली तिने चौकशीत दिली. मुंबईत हा साठा आणल्यांनतर तिने काही डिलरच्या मदतीने हेरॉईन विक्रीची योजना बनविली होती. लाली ही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिला यापूर्वी घाटकोपर आणि वरळी युनिटने अशाच प्रकारे हेरॉईन विक्रीप्रकरणी अटक केली होती. या दोन्ही गुन्ह्यांत ती सध्या जामिनावर होती.

वर्षभरात आठ कारवाईतून ४४ कोटीचे हेरॉईन जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या सर्व युनिटच्या अधिकार्‍यांनी ड्रग्ज तस्करीविरोधात उघडलेल्या मोहीमेत आतापर्यंत आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी सोळा किलो हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत सुमारे ४४ कोटी रुपये आहे. या प्रकरणी नऊ आरोपींना अटक केली आहे.

Related posts

‘स्कूल कॉलेज आणि लाईफ’ द्वारे रोहित शेट्टीचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

Voice of Eastern

तुषार अकॅडमीच्या विजयात गौरेश चमकला

दोन महिला गिर्यारोहकांची ६६७२ मीटर उंच गंगोत्री १ शिखरावर यशस्वी चढाई

Leave a Comment