ठाणे :
सेवा पंधरवड्यानिमित्ताने भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या महिलांच्या आत्मसंरक्षण शिबिराला तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला मोर्चा अध्यक्षा यांच्या संकल्पनेतून महिला मोर्चाच्या या शिबिरात तरुणींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले. त्याचबरोबर सायबर फसवणुकीबद्दल जागरुकतेसाठी माहिती देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्यात भाजपाच्या महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा अंकुश पाटील यांनी ब्रह्रांड येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका नंदा पाटील, कमल चौधरी, कविता पाटील, सरचिटणीस मनोहर सुखदरे, समिरा भारती, मंडल अध्यक्ष हेमंत म्हात्रे, युवा मोर्चाध्यक्ष सुरज दळवी, अनुसुचित जाती-जमाती प्रकोष्टच्या नताशा सोनकर, वृषाली वाघुले आदींची उपस्थिती होती.
पत्रकार योगिता साळवी यांनी तरुणी व महिलांना लव्ह जिहाद व सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीबद्दल माहिती दिली. त्यांनी विविध उदाहरणांद्वारे मुलींवर गुदरलेल्या प्रसंगांबाबत सांगून मुलींना सतर्क केले. या शिबिराला आठवी ते दहावीमधील विद्यार्थीनींची संख्या लक्षणीय होती. त्यानंतर पूर्वा मॅथ्यू यांनी कराटेची प्रात्यक्षिके सादर करून मुलींना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाला माजी पोलिस अधिकारी बारावकर, जैन प्रकोष्टचे जिल्हाध्यक्ष राकेश जैन, प्रतिभा मोकाशी, रितू शिखोन, तृप्ती सुर्वे, सपना भगत आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.