Voice of Eastern

मुंबई : 

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ सोमावारी मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या कृतीमुळे सिनेट सदस्यांमध्ये मानापमानाचे नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. दरवर्षी दीक्षांत समारंभामध्ये व्यासपीठावर मानाचे स्थान असलेल्या सिनेट सदस्यांना यावेळी व्यासपीठाखाली तर व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले. त्यामुळे कुलगुरूंकडून सिनेट सदस्य आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न तसेच आमचा अपमान केल्याचा आरोप करत सिनेट सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात दरवर्षी कुलपती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, कुलगुरू, प्र-कुलगुरू यांच्याबरोबरच व्यवस्थापन समिती आणि सिनेट सदस्यांना व्यासपीठावर मानाचे स्थान दिले जाते. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेला छेद देत कुलगुरूंनी सिनेट सदस्यांना थेट व्यासपीठासमोर उपस्थितांच्या रांगेत बसवले. कोरोनाचे कारण देत संसदीय प्रक्रियेने निवडून आलेले आणि राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांना कोरोनाचे कारण देत व्यासपीठावर स्थान देण्यात आले नव्हते. त्याचवेळी व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले होते. त्यामुळे सर्व सिनेट सदस्यांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात आला. एकीकडे व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना व्यसपीठावर स्थान दिले असताना सिनेट सदस्यांना व्यासपीठावर समोर थेट दुसऱ्या रांगेत बसवण्यात आले. त्यामुळे सिनेट सदस्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.

कुलगुरूंकडून सदस्यांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न – सुधाकर तांबोळी

संसदीय प्रक्रियेने निवडून आलेले आणि राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्यांना व्यासपीठावर स्थान न देता व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना स्थान देऊन कुलगुरूंनी सदस्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना हे कारण फक्त सिनेट सदस्यांना का असा प्रश्न सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला.

हा आमचा अपमान – डॉ. सुप्रिया करंडे

वर्षानुवर्षे परंपरेला छेद देत कुलगुरूंनी सिनेट सदस्यांना व्यासपीठावर स्थान न देऊन नवा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. हा आमचा अपमान असल्याची भावना युवा सेना सिनेट सदस्य डॉ. सुप्रिया करंडे यांनी व्यक्त केली.

काही सिनेट सदस्यांची समारंभाला दांडी

कोरोनामुळे सिनेट सदस्यांना व्यासपीठावर स्थान देण्यात येणार नाही, अशा आशयाचे परिपत्रक दीक्षांत समारंभाच्या एक दिवस अगोदरच विद्यापीठाने काढले होते. विद्यापीठाकडून जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या या अपमानामुळे काही सिनेट सदस्यांनी समारंभाला दांडी मारल्याचे दिसून आले.

 

Related posts

विठ्ठल उमपांनी समाजाला दिलेली ऊर्जा जगातील कुठलीही औषध कंपनी देऊ शकत नाही – सुधीर मुनगंटीवार

Voice of Eastern

इनडोअर क्रिकेट विश्वचषक ऑस्ट्रेलियात सुरू

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती

Voice of Eastern

Leave a Comment