Voice of Eastern

मुंबई :

ब्रेकऐवजी एक्सलेटर पेंडल दाबला गेल्याने कार सुसाट वेगाने ५० मीटर जाऊन रस्त्यावरुन जाणार्‍या सातजणांना उडविल्याची धक्कादायक घटना घाटकोपर परिसरात घडली. अपघातात एका महिलेसह तीन पुरुष आणि तीन मुले जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जिवीतास कोणताही धोका नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जखमींमध्ये राजेंद्रप्रसाद बिंदवय (४९), सपना रविंद्र सनगरे (३५), आदित्य सनगरे (९), वैष्णवी काळे (१६), जयराम यादव (४६), श्रद्धा सुशविरकर (१७), भरतभाई शहा (६५) यांचा समावेश आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन हुंडाई कारचा चालक राजू रामविलास यादव याला अटक केली. हा अपघात बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास घाटकोपर येथील गारुडिया नगर, पुष्पविहार जंक्शन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राजू यादव हा घाटकोपर येथील कामराज नगर परिसरात राहतो. दुपारी पाऊणच्या सुमारास तो त्याच्या हुंडाई असेंट टुरिस्ट कार घेऊन पुष्पविहार जंक्शन परिसरात आला होता. मोबाईल चार्जिंग करताना त्याने कारचा स्टार्टर मारला. यावेळी कार सुरु होऊन पुढे जाऊ लागली. यावेळी ब्रेकऐवजी त्याने एक्सलेटर पेंडल दाबला. त्यामुळे ही कार ५० मीटर सुसाट वेगाने पुढे गेली. यावेळी कारने रस्त्यावरुन जाणार्‍या सात पादचार्‍यांना उडविले होते. अपघाताची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी जखमी झालेल्या सातजणांना पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. त्यात एका महिलेसह एक वयोवृद्ध आणि तीन अल्पवयीन मुलांचा समावेश होता. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी सायंकाळी पोलिसांनी अपघाताची नोंद करुन कारचालक राजू यादवला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची मेडीकल करण्यात आली असून त्याने कार चालविताना मद्यप्राशन केले होते का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. दुपारी घडलेल्या या विचित्र अपघातामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related posts

एमबीबीएसनंतर अन्य महाविद्यालयांमधील इंटर्नशिपचा मार्ग बंद

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘एक लक्ष’ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे लक्ष्य

मुंबईत २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात

Leave a Comment