Voice of Eastern

नवी दिल्ली :

चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व केलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉटसन दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात दाखल झाला आहे. कॅपिटल्सनी संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्याच्या नावाची घोषणा केली आहे. ४० वर्षीय वॉटसन आता मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण आमरे व अजित आगरकर व गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स यांच्यासोबत दिल्लीच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम करताना दिसेल.

आयपीएल ही जगातील सर्वोत्तम लीग आहे. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून, त्यानंतर बंगळूरू व चेन्नई संघाकडून खेळाडू म्हणून माझ्या मनात अनेक अविस्मरणीय आठवणी आहेत. आता प्रशिक्षक म्हणून आणखी आठवणी मला जमवायच्या आहेत. ग्रेट रिकी पाँटिंगच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळणे, हे भाग्य म्हणावे लागेल. कर्णधार म्हणून तो दिग्गज होताच आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा काम करता येणार आहे. तो जगातील सर्वोत्तम प्रशिक्षकांपैकी एक आहे. त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, असे वॉटसनने त्याच्या नियुक्तीनंतर सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या वन डे वर्ल्ड कप २००७ व २०१५ संघाचा वॉटसन सदस्य होता. २०१२ टी-ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत तो प्लेअर ऑफ दी टूर्नामेंट ठरला होता. त्याने १९० वन डे व ५८ टी-ट्वेंटी सामन्यांत ७ हजारहून अधिक धावा आणि २०० हून अधिक विकेट घेतल्या आहेत. २००८मध्ये राजस्थानसोबत, तर २०१८मध्ये चेन्नईसोबत त्याने आयपीएल जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. आयपीएलमध्ये वॉटसनच्या नावावर ३८७५ धावा व ९२ विकेट आहेत.

Related posts

शिंदे सरकारचा मोठा निर्णय : उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट्स अनिवार्य

‘बिनधास्त रहा’ हे शब्द बेतले निष्पापांच्या जीवावर

ठाणेकरांचा ऑनलाईन कर भरण्याकडे कल

Leave a Comment