Voice of Eastern

मुंबई :

मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित ‘श्रीमान बाळासाहेब ठाकरे : चित्र आणि चरित्र’ या विषयावर आयोजित छायाचित्र प्रदर्शनाला राज्यसभेचे खासदार शरदचंद्र पवार यांनी बुधवारी भेट दिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विविध भावमुद्रातील टिपलेले दुर्मिळ छायाचित्र पाहून त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देतांना ते म्हणाले की, बाळासाहेब हे स्वतः ख्यातनाम व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कुंचल्यांना धार होती, ही धार त्यांच्या व्यंगचित्रातून स्पष्ट व्हायची. बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान विशद करताना ते म्हणाले की, बाळासाहेबांनी अनेक जिल्ह्यात नवनेतृत्व तयार केले. सामान्य कुटुंबातील अनेकांना त्यांनी संधी दिली. विधानसभा, मंत्रीमंडळ आणि संसदेत पाठवून अनेकांना प्रोत्साहित केले हे बाळासाहेबांचे मोठे योगदान आहे. अशा व्यापक व्यक्तीमत्व लाभलेल्या बाळासाहेबांच्या विविध छायाचित्रांचे एक आगळे-वेगळे बोलके छायाचित्र प्रदर्शन मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहीत पवार यांनीही छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध प्राधिकरणातील सदस्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची दूर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

Related posts

वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटना, घटनेची सखोल चौकशी होणार – एकनाथ शिंदे

Voice of Eastern

‘होळी’साठी वृक्षतोड केल्यास होणार एक वर्षाची कैद

शिवसैनिकांनो सज्ज व्हा; पालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे – खासदार श्रीरंग बारणे

Voice of Eastern

Leave a Comment