Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

महाराष्ट्र प्राध्यापक सेनेतर्फे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

banner

मुंबई :

महाराष्ट्र प्राध्यापक सेनेतर्फे हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राज्य सरकारने यावर्षी जाहीर केलेल्या थोर व्यक्तींच्या यादीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव प्रथमच समाविष्ट करण्यात आले. यांचे औचित्य साधून महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने ‘आठवणीतले बाळासाहेब…’ या कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. धनराज कोहचाडे, प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सुधाकर लहूपचांग, विशेष अतिथी महादेव जगताप, महाराष्ट्र प्राध्यापक सेनेचे सल्लागार मिलिद साटम, ज्येष्ठ पत्रकार व नाट्य समीक्षक संजय डहाळे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. लहूपचांग यांनी मार्मिक मासिकाबद्दल व बाळासाहेबांच्या आयुष्यावर लिहीलेल्या विविध पुस्तकांची व प्रकाशनांची माहिती दिली. महादेव जगताप यांनी पेन आणि माईक कसे वापरावेत याबद्दलची बाळासाहेबांची आठवण सांगितली. मिलिंद साटम यांनी बाळासाहेबांच्या व शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर अभ्यास होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवणीतले बाळासाहेब ठाकरे या विषयावर बोलताना संजय डहाळे यांनी बाळासाहेबांच्या सहवासातल्या आठवणी सांगून त्यांच्यातील माणूसकीचे साक्षात दर्शन घडविले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कोहचाडे यांनी महाराष्ट्र प्राध्यापक सेनेच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करेल. डॉ. अजयकुमार लोखंडे, प्रा. युवराज नलावडे, प्रा. वैशाली भांगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. महाराष्ट्र उपाध्यक्ष सेनेचे उपाध्यक्ष डॉ. नाना प्रधान यांनी प्राध्यापक सेनेच्या एक वर्षातील कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल भालेराव यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रभारी सचिव डॉ. अतुल रावळ यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Related posts

५१ वर्षीय व्यक्तीच्या पित्ताशयातून काढला ८ सेमीचा खडा

मुंबईतून निघाला बाप्पा भारत-पाक सीमेवर

Voice of Eastern

४थी आशियाई व पहिल्या जागतिक खो खो स्पर्धेसाठी निवड समिती जाहीर; अध्यक्षपदी डॉ. चंद्रजीत जाधव यांची निवड

Leave a Comment