Voice of Eastern

मुंबई : 

मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे मुंबई महापालिकेच्या शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी पूर्व उपनगरातील खड्डयांची पाहणी केल्यानंतर संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार यांना  चांगलेच धारेवर धरले. त्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सत्ताधारी व महापौरांना खड्डे समस्या कळायला लागल्या आहेत, ही समाधानाची बाब असल्याचा टोला लगावला.

कुर्ला येथील जरीमरी आणि चेंबूर येथील सुभाषनगर भागातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. रस्त्यांवरील खड्डे पाहून महापौरांनी संबंधित पालिका अधिकारी, कंत्राटदार यांना चांगलेच धारेवर धरत पुढील १० दिवसांत खड्डे बुजवण्याचे आदेश दिले. त्यावर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांनी, सत्ताधाऱ्यांनी रस्ते, खड्डे यांवर तब्बल २१ हजार कोटी रुपये खर्च केल्यानंतर सत्ताधारी आणि महापौरांना आता खड्डे समस्या कळायला लागल्या आहेत, ही समाधानाची बाब आहे, असा टोला महापौरांना लगावला आहे. तर महापौर किशोरी पेडणेकर यांनी, भाजपाने आधी आपल्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे पाहावेत, असा टोला लगावला आहे.  

Related posts

आपण सर्व मिळून बालकांचा प्रवेशोत्सव साजरा करू या – शिक्षणमंत्री

राष्ट्रीय कॅरम – महाराष्ट्राच्या दोनही संघाची उपांत्य फेरीत धडक 

Leave a Comment