Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशहर

रायगडावर निघालेल्या शिवभक्तांना वरंधा घाटातच झोपणे गाठले, आणि…

banner

महाड :

शिवजयंतीनिमित्त रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी भोरमधील वीर गावातून तीन तरुण एकाच मोटारसायकलवरून शनिवारी पहाटे निघाले. वरंधा घाटातून पहाटे ४ वाजताच्या सुमारास जात असताना थंडगार हवेच्या झुळकीमुळे चालकाला झोप लागली. काही कळायच्या आताच मोटारसायकल ५०० फूट खोल दरीत कोसळली.

रायगडमधील महाड आणि पुण्यातील भोर या दोन तालुक्यातील हद्दीवर वरंधा घाटात वाघजाई मंदिरापासून दोन मिनिटे अंतरावर भोरच्या दिशेला असलेल्या वीर गावातील तीन तरुण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रायगडावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी शनिवारीरात्री मोटार सायकलने रायगड किल्ल्याच्या दिशेने निघाले. पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास वरंधा घाटातून जात असताना थंड हवेमुळे चालकाला झोप लागली आणि पुढे काही कळायच्या आताच मोटारसायकल ५०० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने त्यातील एक जखमी तरुण ५०० फूट खोल दरीतून कसाबसा वर आला. त्याच्या मोबाईलला नेटवर्क मिळताच त्याने परिचित व अपरिचित अशा सर्वाना कॉल लावले. त्यातूनच पुण्यात राहत असलेले विपुल देशमुख यांनी पारमाची/माझेरी पोलीस पाटील यांचा फोन नंबर मिळवून त्यांना अपघाताची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आंधळे यांना तात्काळ खबर देऊन त्वरित रुग्णवाहिका मागवून पुढील तरुण यांचे प्राण कसे वाचवता येतील या दृष्टीने सूत्र हलवली. वरंधमधील नागेश (उत्तम) देशमुख आणि पारमाचीवाडी येथील समीर सुतार या दोन तरुणांनी जीवाची बाजी लावून कमरेला दोर बांधून खाली उतरले. त्यांच्यासह अन्य तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून जखमी तरुणांचे प्राण वाचवले. पारमाची, वरंध, माझेरी आणि उंबर्डे येथील पंचक्रोशीतील सर्व तरुण आणि ग्रामस्थ तसेच ट्रक चालक यांनी खूप मेहनत घेऊन दोन तरुणांना दोराच्या साहाय्याने बाहेर काढले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तिन्ही जखमी तरुणांना रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी महाड शासकीय रुग्णालयात पाठवले. त्यानंतर भोर पोलीस ठाण्याशी संपर्क करून त्यांना घटनेची माहिती देण्यात आल्याचे माहिती पारमाची/माझेरीचे पोलीस पाटील नितीन सकपाळ यांनी दिली.

Related posts

दादरमध्ये होणार पुरुष-महिला व २१ वर्षाखालील इनडोअर क्रिकेट मैदानी निवड चाचणी

ठाकरेंचे सरकार ‘ना हलले ना फुलले’- नारायण राणे

म्हाडाची ऑनलाईन परीक्षा ३१ जानेवारीपासून

Leave a Comment