शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे यांची आज निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांचे निधन झाले अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
राजकीय नेत्यांचे ट्विट
I am pained beyond words. The demise of Shivshahir Babasaheb Purandare leaves a major void in the world of history and culture. It is thanks to him that the coming generations will get further connected to Chhatrapati Shivaji Maharaj. His other works will also be remembered. pic.twitter.com/Ehu4NapPSL
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली.
— Amit Shah (@AmitShah) November 15, 2021
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशाहीर पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिल्या आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 15, 2021
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.