Voice of Eastern

मुंबई:

‘बोलो अंबे माता की जय’ या जयघोषात आता येत्या काही दिवसातच आता नावरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली साजरा केला जाऊ शकतो. आपल्या भव्य दिव्य देखाव्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील प्रसिद्ध आर्थर रोडची आई संतोषी माता या मंडळाचा देखावा कसा असणार आहे ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दर वर्षी मुंबईतील विविध नवरात्रोत्सव मंडळं विविध देखावे आणि भव्य दिव्य सजावट करत जगदंबेचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र गेल्या वर्षी अत्यंत साधेपणाने हा उत्सव साजरा केला गेला. साधेपणा जरी असला तरी उत्साह मात्र कायम असल्याचे स्पष्ट मत संतोषी माता मंदिर ट्रस्टचे सदस्य निखिल बागुल यांनी व्यक्त केले.

दर वर्षी आपल्या भव्य दिव्य सजावटीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘आर्थर रोडची आई संतोषी माता’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या श्री संतोषी माता मंदिर ट्रस्टचे यंदाचे हे ४३ वे वर्ष आहे. या वर्षी ट्रस्टच्या वतीने राज दरबाराचा देखावा साकारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  महत्वाचं म्हणजे दिग्दर्शक गणेश कवीथिया यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण देखावा साकार करण्यात येणार असून फक्त १० दिवसात हा  संपूर्ण देखावा साकारण्यात येणार आहे. या अगोदर किल्यांचं देखावा, अक्षरधाम मंदिर, राम मंदिर या सारखे विविध देखावे या मंडळाने उत्सव कालावधीत साकार केले आहे.

उत्सव आणि सामाजिक भान लक्षात घेता विभागातील नागरिकांसाठी ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम सुद्धा हाती घेतले जाणार आहेत. या मध्ये विभागातील नागरिकांसाठी नेत्र तपासणीसोबत आरोग्य शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे. तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.वेंकट पै ( पै दादा ) यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदा देखील शासनाला संपूर्ण सहकार्य करत आणि भाविकांची काळजी घेत उत्सव साजरा केला जाणार आहे.
-राजन धुरी,

कार्यकारणी सदस्य

Related posts

संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर वाचला समस्यांचा पाढा

युरोपमध्ये लवकरच साकारणार पहिले विठ्ठल मंदिर

‘गुल्हर’चं ‘आभाळाने पंख…’ रसिकांच्या भेटीला

Leave a Comment