Voice of Eastern
क्रीडाताज्या बातम्यामोठी बातमी

राष्ट्रीय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायक्वांदो स्पर्धेत श्रेया जाधवला सुवर्ण

banner

मुंबई :

नाशिक येथील मीनाताई ठाकरे संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय चॅम्पियन ऑफ चॅम्पियन तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या श्रेया नितीन जाधवने शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्रेयाने आपले सर्व सामने सफाईदारपणे जिंकले. या स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे आगामी मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी ती पात्र ठरली.

नाशिक येथील स्पर्धा इंडिया तायक्वांदो आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मुंबईच्या श्रेया नितीन जाधवने शानदार कामगिरी करताना सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे आगामी मेक्सिको येथे होणाऱ्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेसाठी ती पात्र ठरली. या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना श्रेयाने आपले सर्व सामने सफाईदारपणे जिंकले. श्रेया सध्या दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त भास्कर करकेरा यांच्या बीकेस अकादमीत सिद्धेश घाग आणि प्रेम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाचे प्रशिक्षण घेत आहे. माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात श्रेया जाधव सध्या कला शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. श्रेयाच्या या सुरेख कामगिरीबद्दल कॉलेजतर्फे देखील तिचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related posts

मुंबईतील शाळा ३१ जानेवारी२०२२ पर्यंत राहणार बंद!

बेरोजगार उमेदवारांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहे कांचन वृक्ष!

Leave a Comment