Voice of Eastern

पुणे :

अनाथ बालकांसांठी सेवा कार्य करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून त्या रुग्णालयातच होत्या. सिंधुताई यांचा चार मुले असून, त्यांनी आतापर्यंत जवळपास १५०० मुलांना दत्तक घेतले आहे.

सिंधुताई यांनी आजपर्यंत अनेक अनाथ बालकांचा सांभाळ केला. त्यासाठी अनेक खडतर प्रसगांना त्यांना सामोरे जावे लागले होते. २०१० साली त्यांना महाराष्ट्र सरकारचा अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१२ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने तसेच २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सिंधुताई यांना जवळपास ७५० आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या सिंधुताईंचे वयाच्या नवव्या वर्षीच लग्न झाले होते. मात्र त्यांच्या आयुष्यात आलेल्या संघर्षमय प्रसंगामुळे त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली व त्या अनेक अनाथ मुलांच्या माय बनल्या. अनाथ मुलांना सांभाळ करून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी १९९४ मध्ये ममता बाल सदन संस्थेची पुण्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु केली. या संस्थेत अनाथ मुलांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना भोजन, कपडे अन्य सुविधाही पुरवल्या जातात. शिक्षण पूर्ण झाल्यावर या मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच त्यांना योग्य जोडीदार शोधून त्यांचे विवाह लावण्याचे कार्यही संस्थेकडून करण्यात येते.

Related posts

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – गुलाबराव पाटील

मुंबईत २ वर्षात ४ लाख उंदरांची कत्तल

भारतीय जनता पक्षातर्फे विक्रोळीत दहीकाला उत्साहात साजरा

Leave a Comment