Voice of Eastern

मुंबई :

ज्येष्ठ समाजसेविका, अनाथांची माय, प्रेमाची साय असलेल्या, सर्व सामान्यांची ताई असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ४ जानेवारी २०२२ रोजी निधन झाले आणि महाराष्ट्रासह सर्व देश शोकसागरात बुडाला.

सिंधुताई सकपाळ यांची एक खंत होती. कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात ताईंच्या कार्यावर एक पाठ देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राने त्याची दखल घेतली नाही, याची खंत सिंधुताईंनी व्यक्त केली.  त्यावर बनवलेल्या व्हिडीओची क्लिप आता सर्वत्र व्हायरल झाली आहे. त्यात महाराष्ट्रात मोठ होण्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो, अशी खंत व्हिडिओमध्ये व्यक्त केली आहे. जिथे मेल्यानंतर माणसे मोठी होतात तो महाराष्ट्र आहे, याच दु:ख आहे. सोन्यासारखी माणसे या मातीमध्ये जन्माला आली त्या महाराष्ट्रात जन्मलेल्या सिंधुताईंची अखेरची इच्छा मात्र शिक्षण विभागाने आता पूर्ण करावी असा सूर उमटत आहे. शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून सर्वसामान्यांची इच्छा पूर्ण करावी असा एक संदेश समाजात फिरत होता. ती क्लिप व सिंधुताई सपकाळ यांची खंत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी मुंबई येथील शिक्षक उदय नरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवली. मुख्यमंत्र्यानी याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यानी शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठवले आहे.

सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याचा व मानवतावादी दृष्टिकोन लवकरच शालेय अभ्यासक्रमात पहायला मिळेल असा आशावाद शिक्षकवर्ग व्यक्त करत आहे.

Related posts

अकरावी प्रवेशाचे अर्ज भरण्यास ३० मे पासून होणार सुरुवात

‘युपीएससी’ परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन; प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबरपासून

जपानी विद्यार्थ्यांनी घेतली ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट

Voice of Eastern

Leave a Comment