Voice of Eastern
गुन्हेमोठी बातमी

भांडुपमधून जप्त केली सहा कोटींची व्हेल माशाची उलटी

banner
  • मुंबई :

समुद्रातील सोने म्हणून ओळख असलेल्या व्हेल माशाची उलटीच्या (अँबरग्रीस) तस्करीप्रकरणी घाटकोपर युनिटच्या गुन्हे शाखेने भांडुपमधून दोघांना अटक केली. योगेश चव्हाण आणि सुरेंद्र छोटो साव अशी आरोपींची नावे असून, त्यांच्याकडून सुमारे सहा कोटी रुपयांची ५ किलो ९१० ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

भांडुपमध्ये काही जण व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक मनिष श्रीधनकर यांच्यासह सुधीर जाधव, आनंद बागडे व अन्य पोलीस पथकाने बुधवारी पूर्व द्रुतगती मार्गावरील भांडुप पादचारी पुलाजवळ कांजूरमार्ग-भांडुप सर्व्हिस रोडवर साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी सव्वासहा वाजता तिथे आलेल्या दोन तरुणांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅग्जची तपासणी केली असता त्यामध्ये पोलिसांना ५ किलो ९१० ग्रॅम वजनाची व्हेल माशांची उलटी सापडली. या उलटीची किंमत सुमारे सहा कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. आरोपी मुलुंड आणि मालाडचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांनी व्हेल माशांची उलटी कोठून आणली, ती उलटी ते कोणाला विकणार होते. या गुन्ह्यांत त्यांचे इतर काही सहकारी आहेत का, यापूर्वीही त्यांनी व्हेल माशांची उलटीची तस्करी केली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

का आहे मागणी

व्हेल माश्याची उलटी समुद्रातील तरंगते सोने म्हणून ओळखली जाते. हा पदार्थ स्पर्म व्हेल माशांच्या पोटात तयार होतो. त्याचा वापर अतिउच्च प्रतीचे परफ्युम, औषधांसह सिगारेट, मद्य आणि पदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. त्यामुळे व्हेल माशांच्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने राज्य सरकारने त्यावर बंदी घातली आहे.

Related posts

राज्यपालांनी असंवैधानिक वागू नये- यशोमती ठाकूर

‘आपले सरकार महाऑनलाईन’ संकेतस्थळ पूर्ववत न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

के. जे. सोमय्या रुग्णालयामध्ये पहिले यशस्वी अवयवदान; १२ वर्षीय मेंदू मृत मुलामुळे वाचले तिघांचे प्राण

Voice of Eastern

Leave a Comment