Voice of Eastern

मुंबई :

युवासेना सचिव वरूण सरदेसाई साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त युवासेना वरळी विधानसभेच्या वतीने  वात्सल्य फाउंडेशन ट्रस्ट, रखांगी चौक येथे शालेय अनाथ विद्यार्थ्यांस अन्नधान्य वाटप करण्यात आले. महत्वाचे म्हणजे आमदार सुनिल शिंदे यांच्या उपस्थितीत हा संपूर्ण कार्यक्रम  पार पडला.

या कार्यक्रमात वात्सल्य फाऊंडेशनचे व्यवस्थापक संदिप तिजोरे यांच्याकडे हे सर्व साहित्य सुपूर्द करण्यात आले.त्यावेळी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई समन्वयक तुषार महाले,शिवसेना सोशल मीडिया समन्वयक शैलेश सिंग,उपविभाग अधिकारी जयश्री गुरव,प्रियांका चौगुले,विधानसभा समन्वयक नेहा वर्मा,शाखा अधिकारी मंगेश कुवेकर,स्नेहल देशमुख,अंकिता चव्हाण,शाखा समन्वयक संतोष सरोदे,समृद्धी कोयंदे,शाखा चिटणीस रुपेश घाग,उपशाखाधिकारी साक्षी बोंगार्डे,आदित्य कांबळे,मयूर सावंत,रोहन पाटणकर,आदिनाथ धडाम,राहुल गाला,मयूर कांबळे,ज्ञानेश्वर कासार,कुणाल जाधव,गणेश कासार,ओमकार साळगावकर,युवासैनिक बंटी पडेलकर आदी उपस्थित होते.

या सोबतच १०वी उत्तीर्ण १००० विद्यार्थ्यांना फोल्डर वाटप आणि विभागातील नागरिकांना मास्क वाटपाचा कार्यक्रम देखील हाती घेतला असल्याचा वरळी विधानसभा युवा विभाग अधिकारी संकेत सावंत आणि आकर्षिका पाटील यांनी सांगितले.

Related posts

पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा – रवींद्र चव्हाण

विक्रोळीच्या साईनाथ मित्र मंडळाने साकारले पुरातन कोल्हाळेश्वर मंदिर

Voice of Eastern

पूरग्रस्त भागातील ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

Leave a Comment