भारत देशाच्या २९ राज्यांपैकी एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध राज्य म्हणजे गुजरात. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर स्थित या राज्यातून महात्मा गांधी, सरदार पटेल सारखे अनेक दिग्गज आपल्याला लाभले. या सोबतच मुकेश अंबानी, अजीज प्रेमजी सारखे अनेक महान उद्योजक देखील या आपल्या देशाला लाभले आहेत. अरे सध्याचे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत. मात्र गुजरात बद्दल काही वेगळी गोष्ट तुम्हाला माहित आहे का? नसेल माहिती तर नक्की वाचा ही बातमी.
हिंदू धर्मानुसार चार धाम पैकी एक धाम द्वारका आणि १२ ज्योतिर्लिंग पैकी एक सोमनाथ हे गुजरात राज्य मध्ये स्थित आहे. पर्यटनाच्या दृष्टीने सातपुडा पर्वत, गिर अभ्यारण, चंपानेर, पलीताणा यासारखे अनेक पर्यटन स्थळ देखील गुजरातमध्ये आहे. गुजरात हे भारताचं पेट्रो-केमिकल हब आहे. संपूर्ण भारत देशाचे ४५% पेट्रो केमिकलचे उत्पादन गुजरात राज्य एकटं करत आहे.
गुजरात एक समृद्ध राज्य आहे. गेल्या १२ वर्षात इथला जीडीपी १२% दराने वाढत आहे जे चीनपेक्षा ही अधिक आहे. गुजरात मधील सुरत हे शहर आपल्या हिऱ्यांच्या व्यापारासाठी खूपच जास्त प्रसिद्ध आहे. जगातले ८० % हिरे हे सुरत मध्येच पॉलिश केले जातात. भारताच्या श्रीमंत शहराच्या यादीत सुरतचा जीडीपी ५९.८ बिलियन डॉलर असून ९ व्या क्रमांकावर आहे.भारतच्या स्वच्छ राज्यांच्या यादीत देखील गुजरात ३ऱ्या क्रमांकावर आहे.
जगात गुजराती भाषा बोलणारे ५९ मिलियनपेक्षा अधिक लोक आहे. यासाठीच जगात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये गुजराती भाषा ही २६ व्या स्थानकावर आहे. जगातला सर्वात पहिला शुद्ध शाकाहारी सब-वे, पिझ्झा हट, आणि डॉम्मिनोसचा आउटलेट हे गुजरात येथील अहमदाबाद येथे सुरू करण्यात आले. उत्तर अमरिकेतील ६० % भारतीय हे गुजराती आहेत. तर अमेरिकेतील १७००० पेक्षा अधिक हॉटेल आणि मोटेल हे गुजराती लोकांचे आहेत. गुजराती लोक गोड खाण्याचे खूप शौकीन असतात. त्यांच्या बहुतांश पदार्थ गोड असतात. यासाठीच बहुतेक एका बाजूला देशातला सर्वात जास्त साखरेचा खप या राज्यात होतो. तर दुसऱ्या बाजूला मीठ उत्पादन करण्यात या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. देशातले ७० % मिठाचे उत्पादन गुजरात मध्ये होतं. जर गुजरात एक देश असता तर अनेक यूरोपियन आणि एशियाई देशांना मागे टाकत जगातला ६७ वां सर्वात श्रीमंत देश झाला असता.