Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमी

पद्मश्री तात्याराव लहाने यांच्या मुलाचा जे.जे. रुग्णालयातील सेवेचा राजीनामा; अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे राजीनामा सत्र सुरू

banner

मुंबई :

अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे सेवा नियमित करण्याचे आश्वासन सरकारने कोरोना काळात दिले. परंतु कोरोना ओसरल्यानंतर सरकारने आश्वासनाची पूर्तता करण्यास सचिवांच्या हट्टामुळे विलंब झाला. अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांना ४३ दिवसांपासून साखळी उपोषण करण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणार्‍या भरतीमध्ये शासकीय सेवेतील अस्थायी डॉक्टरांना डावलले जात आहे. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी आपल्या सेवेचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे पुत्र डॉ. सुमित लहाने यांनी आपल्या सेवेचा राजीनामा दिला.

जे.जे. रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे पुत्र डॉ. सुमित लहाने नेत्र विभागात अस्थायी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनीही सरकारच्या उदासीन धोरणांमुळे स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. सुमित लहाने यांनी वडिलांप्रमाणे रूग्णसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. परंतु शासनाने सेवा नियमित न केल्यामुळे निराश झालेल्या डॉ. सुमित लहाने यांनी राजीनामा दिल्याने गोरगरीब रुग्णांना त्यांच्या सेवेपासून वंचित राहावे लागणार आहे. डॉ सुमित हे यापुढे खाजगी व्यवसाय करत सामाजिक बांधीलकी जोपासणार आहेत. सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे डॉक्टरांना निवड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, परंतु या निवड प्रक्रिमधे खासगी डॉक्टरांना प्राधान्य देण्यात येत आहे. शासकीय सेवेतील डॉक्टरांना न घेता खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची भरती केली जात आहे. शासनाने तात्काळ सेवा नियमित न केल्यास अनेक तज्ञ डॉक्टरांचे राजीनामे देण्याचे सत्र सुरु होणार असल्याचे चिन्ह दिसू लागली आहेत.

Related posts

‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’मध्ये हुल्लडबाजांचा गोंधळ

Voice of Eastern

मुंबईत आढळले ओमायक्रॉनचे ७ रुग्ण

Voice of Eastern

घरगुती गणपती देखाव्यातून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश

Voice of Eastern

Leave a Comment