Voice of Eastern

मुंबई :

Jio MAMI फिल्म फेस्टिव्हलमध्ये सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केनेडी’चे कौतुक झाल्यानंतर अनुराग कश्यप दिग्दर्शित आणि सनी लिओनी आणि राहुल भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. खास आग्रह केल्यामुळे आता या चित्रपटाचं दुसरे स्क्रीनिंग शेड्यूल करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील रीगल सिनेमामध्ये केनेडीचे खास स्क्रिनिंग पार पडणार आहे.

‘केनेडी’चा प्रेमियर सुरुवातीला NMACC मधील ग्रँड थिएटरमध्ये पार पडला. तिकिटे काही मिनिटांतच विकली गेली. चाहत्यांनी पुन्हा एकदा चित्रपटाला खूप प्रेम दिलं. ‘केनेडी’ व्यतिरिक्त सनी लिओनी ‘कोटेशन गँग’मधून तिच्या तमिळ चित्रपटात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन यांसारख्या प्रतिष्ठित अभिनेत्यांसह ती स्क्रीन शेअर करेल. तामिळ चित्रपटसृष्टीत सनीच्या प्रवेशाची खूप अपेक्षा आहे तिचे चाहते या नवीन भूमिकेतील तिच्या अभिनयाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Related posts

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमशी होणार सांमजस्य करार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईतील १२५ लसीकरण केंद्र पालिका बंद करणार

Voice of Eastern

स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्रनंतर कामा आणि आल्ब्लेस रुग्णालयाचे बदलत रुपडे

Leave a Comment