Voice of Eastern
आरोग्य

कोविड लसीचा दुसरा डोस घेणा-या लाभार्थ्यांसाठी ९ सप्टेंबरला विशेष सत्र; पहिला डोस मिळणार नाही

banner
  • मुंबई

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे. नागरिकानी कोविड लसीचे दोन्ही डोस घेवून लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रावर गुरुवारी, ९ सप्टेंबर रोजी लसीचा दुसरा डोस घेणा-या लाभार्थ्‍यांसाठी विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही, असे पालिकेने जाहिर केले आहे.

दुसरी मात्रा देय असलेल्या नागरिकांसाठी लस मात्रांच्या उपलब्धतेनुसार विशेष लसीकरण सत्र ४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले हेाते. या लसीकरण सत्रास नागरिकांचा उत्‍तम प्रतिसाद मिळाला या दिवशी १ लाख ७९ हजार ९३८ लाभार्थ्‍यांना दुसरी मात्रा देण्‍यात आली. नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन गुरुवारी दुसरा डोस घेणा-या लाभार्थ्‍यांसाठी पुन्हा एकदा विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे. या दिवशी कोविड लसीचा पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

४५० कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित

लसीकरणासाठी मुंबई महापालिका व शासकीय रुग्णालये मिळून ३२० तर खासगी रुग्णालयात १३० अशी एकूण ४५० कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित आहेत. ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत एकूण ७१ लाख २४ हजार ८२० लाभार्थ्यांना (७९ टक्के) लसीची पहिली मात्रा तर २८ लाख ५० हजार ५५४ एवढ्या लाभार्थ्यांना (३१ टक्के) दुसरी मात्रा देण्यात आली आहे

Related posts

मुंबईतील २०० हून अधिक सार्वजनिक प्रसाधनगृहांमध्‍ये सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन

Voice of Eastern

अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये संशोधनासाठी आयआयटी कानपुरचे अपोलो हॉस्पिटल्ससोबत सामंजस्य करार

Voice of Eastern

नवी मुंबईतील ‘नेफ्रोलॉजी-क्रिटिकल केअर मेडिसिन’ परिषदेला भारत, मालदीवमधील 100 हून अधिक प्रतिनिधी 

Leave a Comment