Voice of Eastern
ताज्या बातम्यानोकरीमोठी बातमी

‘मी उद्योजक होणार’ विनामुल्य मार्गदर्शन कार्यशाळेला तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

banner

मुंबई : 

महापुरुष बालदिप मंडळ आणि डॉट कॉम्पुटर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी तरुणांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा यासाठी विनामुल्य मार्गदर्शन कार्यशाळा सायंकाळी साडेचार वाजता अभ्यासिका, नरेपार्क मैदान, परळ, मुंबई या ठिकाण आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी प्रदीप सावंत यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना CMEGP सारख्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.

या प्रसंगी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करताना महापुरुष बाल दीप मंडळ आणि डॉट कॉम्प्युटरचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे MCED चे विभागीय अधिकारी प्रदीप सावंत, प्रथमेश, उद्योग संचानालयाचे कोळी यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी महापुरुष बाल दीप मंडळाचे राकेश कांबळी, विकास वराडकर, डॉट कॉम्प्युटरचे प्रमोद वराडकर, सोनाली जंगम, संगीता वराडकर, मनाली परब उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजिका बाने यांनी आपले मत व्यक्त करून आभार मानले. या कार्यशाळेला तरूणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related posts

दिवा शहरात हवेत गोळीबार; सुरक्षारक्षकाला अटक

ओडिसा, मद्रासच्या मगरी येणार मुंबईकरांच्या भेटीला

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका -अजित पवार

Leave a Comment