Voice of Eastern

मुंबई

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. इयत्ता दहावीची परीक्षा मंगळवार, दिनांक 15 मार्च 2022 तर इयत्ता बारावीची परीक्षा शुक्रवार दि.4 मार्च 2022 पासून सुरू होत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी जाहीर केले आहे.

यासंदर्भातील सविस्तर विषयनिहाय दिनांक आणि वेळ याबाबतचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या अधिकृत संकेतस्थळ https://www.mahasscboard.in यावर अपलोड करण्यात आले असून परीक्षेपूर्वी शाळांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही शिक्षण विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या बीकॉम सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थानाचे करणार सुशोभीकरण – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Voice of Eastern

राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात सेवानिवृत्त

Leave a Comment