Voice of Eastern

मुंबई :

योगासना स्पोर्ट्स ॲण्ड वेलनेस असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय योगासने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २७ आणि २८ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी डॉ. मंजू लोढा यांच्या हस्ते रविवारी दुपारी १ वाजता पार पडणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातून मोठया प्रमाणात योग स्पर्धक सहभागी होणार आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी २८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत पार पडेल.

हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याच्या फरकामध्ये पुन्हा लबाडी – श्रीरंग बरगे यांची सरकारवर टीका

स्पर्धेच्या आयोजनाविषयी माहिती देताना ‘योगासना स्पोर्ट्स ॲण्ड वेलनेस असोसिएशन’चे अध्यक्ष सुधीर गोकर्ण यांनी सांगितले की, जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगचा समावेश आवश्यक आहे. योग केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहतं. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर तुम्हाला योगचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे योग दैनंदिन दिनचर्येचा भाग असला पाहिजे, असे आवाहन सुधीर गोकर्ण यांनी केले. राज्यस्तरीय असणारी ही स्पर्धा २७ आणि २८ नोव्हेंबर अशी दोन दिवस चालेल, या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सोमवारी २८ नोव्हेंबरला सायंकाळी ७ ते ८ या वेळेत अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये पार पडेल. या राज्यस्तरीय योग स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे क्रीडा मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी डॉ. मंजू लोढा यांच्या हस्ते रविवारी दुपारी १ वाजता पार पडणार आहे. दोन दिवसीय चालणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातून योग स्पर्धक मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या सर्व योग स्पर्धकांची योगासना स्पोर्ट्स ॲण्ड वेलनेस असोसिएशनच्या वतीने उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

योग केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहतं. इतकंच नाही तर मानसिक तणावात असाल तर तुम्हाला योगचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे योग दैनंदिन दिनचर्येचा भाग असला पाहिजे, ही भावना राज्याप्रमाणे देशभरातील नागरिकांमध्ये वाढीस लागावी यासाठी योगासना स्पोर्ट्स ॲण्ड वेलनेस असोसिएशनच्या वतीने येत्या काही काळात राष्ट्रीय स्तरावर देखील या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती योगासना स्पोर्ट्स ॲण्ड वेलनेस असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर गोकर्ण यांनी सांगितले.


हेही वाचा : देशावर हल्ला करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत करु – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा ४ एप्रिलपासून जनता दरबार सुरू!

राज्य मानांकन कॅरम स्पर्धा : योगेश धोंगडेची व्हाईट आणि ब्लॅक स्लॅमसहीत आगेकूच 

Voice of Eastern

मुंबई खो खो संघटनेचे पंचवर्ग ४ जुलैपासून सुरु

Voice of Eastern

Leave a Comment