Voice of Eastern

मुंबई : 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक ७ ते ९ मे, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल दिनांक आज जाहीर करण्यात आला असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेमध्ये चौगुले प्रमोद बाळासाहेब हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून म्हात्रे सोनाली अर्जुनराव या महिलांमधून तसेच यादव विशाल महादेव हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत. निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका , उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून दहा दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचनां दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाणे कळविले आहे.

Related posts

मुंबईमध्ये २६९ अनधिकृत शाळा; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन

सेवा पंधरवडा कर्तव्यपथ उपक्रमांतर्गत समाज कल्याण विभागाचे उल्लेखनीय कार्य

विलेपार्ले येथील एलआयसी कार्यालयाला आग

Leave a Comment