Voice of Eastern
आरोग्यताज्या बातम्यामोठी बातमीशहर

जागतिक हृदय दिनानिमित्त वाहतूक पोलीस आणि चालकांना स्ट्रेस बॉलचे वितरण

banner

जागतिक हदय दिनाच्या औचित्य साधून मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने एक विशेष मोहिम राबवित वाहतूक पोलीसांना तणावमुक्त राहण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देण्यासाठी आणि जीवनशैलीत चांगले बदल करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. भाईंदरच्या गोल्डन नेस्ट सर्कलसारख्या वर्दळीच्या ठिकाणी सुमारे ६०० वाहतूक पोलिसांना आणि चालकांना स्ट्रेस बॉलचे वाटप करण्यात आले.

तणावामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोक सारख्या समस्या होऊ शकतात. हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगास कारणीभूत ठरू शकते, कारण तणावग्रस्त लोक धूम्रपान, अति खाणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यासारख्या चूकीच्या जीवनशैलीचा अवलंब होऊ शकतो. तणावाबरोबरच, खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, आसीन जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्टेरॉलची पातळी यासारख्या इतर कारणांमुळे हृदयाला एथेरोस्क्लेरोसिससारख्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या निर्माण होतात. या हृदयाच्या समस्यांमुळे सर्वच वयोगटातील लोकांमध्ये मृत्यू दर वाढला आहे. कामाचे वाढते तास, खाण्या-पिण्याच्या अयोग्य वेळा, ताणतणाव या साऱ्यांचा आरोग्यावर विपरित परिणाम होत असून सर्वांना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.किमान दिवसातून तासभर चालले पाहिजे. तणाव, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि मधुमेह तसेच हृदयाच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नका.

याप्रसंगी सहायक्क पोलिस निरकिक्ष मंगेश कड, वाहतूक शाखा, काशी मिरा विभाग यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमातंर्गत हॉस्पीटलमधील कर्मचाऱ्यांनी हदयाच्या आकाराचा पोशाख परिधान करून ६०० स्ट्रेस बॉल्सचे वितरण केले. तसेच या माध्यमातून निरोगी , तणावमुक्त जीवन जगण्याचा संदेश दिला. तणाव हृदयाला हानी पोहचवते, म्हणून सर्वांनी व्यायाम, धूम्रपान, दारू, तेलकट आणि प्रक्रिया केलेले पपदार्थ न खाता, निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रोत्साहित करण्यात आले. त्यांना तणावमुक्त राहण्याकरिता व्यायामप्रकार देखील शिकविण्यात आले. हृदयासंबंधीत कोणताही दोष शोधण्यासाठी दर सहा महिन्यांनी नियमित तपासणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

काशीमिराचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश काड सांगातात की, तणावमुक्त हृदयाचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे जो मिरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या वतीने राबविण्यात आलेला. अनेक पोलीस अधिकारी त्यांच्या हृदयाच्या समस्यांवर वेळेवर उपचार करण्यात अपयशी ठरतात तसेच छातीत दुखणे, श्वासोच्छवासात अडथळे येणे, धडधडणे आणि दंडामध्ये येणारा कमकुवतपणा यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. हृदयाच्या समस्या व्यवस्थापित करण्यासाठी वेळेवर हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. या उपक्रमामुळे आम्हाला आमच्या हृदयाचे आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली आणि आम्हाला त्याची काळजी घेण्यासाठी प्रेरित करण्यात आले. आमच्यासाठी अशा माहितीपूर्ण उपक्रमाचे नियोजन केल्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो.

Related posts

मेस्टाने सुरू केल्या ग्रामीण भागातील शाळा

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान

Voice of Eastern

फॉक्सकॉनप्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले – जयंत पाटील

Leave a Comment