Voice of Eastern
ताज्या बातम्यामोठी बातमीशिक्षण

स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात मुंबई उत्तर विभागाची दमदार कामगिरी; राज्यात चौथा क्रमांक पटकावला

banner

मुंबई : 

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या स्वच्छता मॉनिटर प्रकल्पात राज्यस्तरावर शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाने चौथा क्रमांक पटकावला असून राज्यातील सर्वोकृष्ट १०० पैकी उत्तर विभागातील १९ शाळांचा समावेश झाला असल्याची माहिती उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांनी दिली.

केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाला मदत व्हावी यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने लेट्स चेंज हा उपक्रम शाळा शाळांमध्ये सुरू करण्यात आला. त्यासाठी शाळांमधून स्वच्छता मॉनिटर नेमण्यात आले समाजात स्वच्छतेविषयी जनजागृती करणे, सार्वजनिक ठिकाणी कुणी कचरा टाकताना दिसला तर त्याला अटकाव करून कचरा न टाकण्याची विनंती करणे असे या उपक्रमाचे स्वरूप होते या प्रकल्पाची सुरुवात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाली होती.

प्रकल्प यशस्वी करण्यासाठी उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ मुश्ताक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गजेंद्र बनसोडे यांनी तयारी केली होती नोंदणी केलेल्या शाळांना याबाबत माहिती देऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळांना मार्गदर्शन केले होते.
स्वच्छता मॉनिटर च्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ६४ हजार १९१ शाळांनी सहभाग घेतला

टॉप १०० मध्ये उत्तर विभागातील १९ शाळांची निवड

या प्रकल्पात राज्यात निवडलेल्या टॉप १०० शाळांमध्ये उत्तर विभागातील १९ शाळांचा समावेश आहे त्यामध्ये अल फलाह इंग्लिश स्कूल, एस के सोमय्या विनय मंदिर, राजीव गांधी विद्यालय, पं नेहरू हिंदी विद्यालय, अंजुमन खैरुल उर्दू, कार्तिका हायस्कूल, मायकल हायस्कूल, विनोद शुक्ला हायस्कूल, नूतन विद्यामंदिर, पंत वालावलकर हायस्कूल, अफेक हायस्कूल, अहिल्या विद्यालय, बंट्स संघा ज्यु कॉलेज, आर आर ट्रस्ट इंग्लिश मेडिअम, मातोश्री कस्तुरबेन ठक्कर विद्यालय, उत्कल इंग्लिश हायस्कूल, अल बरकत इंग्लिश स्कूल, आय डी यु बी एस स्कूल, संदेश विद्यालय या शाळांचा समावेश आहे

Related posts

मुंबईमध्ये मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ

Voice of Eastern

कौशल्य विकास विभागाच्या रोजगार मेळाव्यात ७४६ उमेदवारांची नोकरीसाठी निवड

विक्रोळीच्या साईनाथ मित्र मंडळाने साकारले पुरातन कोल्हाळेश्वर मंदिर

Voice of Eastern

Leave a Comment