Voice of Eastern

मुंबई : 

आयटीआयमधील विद्यार्थ्यांना अधिकाधिक उत्पादनाभिमुख प्रशिक्षण मिळावे यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजना (पीओटीएस) आखली आहे. त्यानुसार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात चालवण्यात येणार्‍या ४१७ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अधिक उत्पादनाभिमुख प्रशिक्षण मिळून त्यांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राबवण्यात येणार्‍या पीओटीएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दुरुस्ती व देखभाल विषयक कामे, अल्प मुदतीचे प्रशिक्षण विषयक कामे आणि उत्पादनाभिमूख सेवा विषयक कामे करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक सक्षम उत्पादनाभिमूख प्रशिक्षणांतर्गत गणवेश बनवणे, वाहनांची निगा, दुरुस्ती ब्युटीपार्लरची कामे, नववधूसाठी साजशृंगार, धातूच्या वस्तू बनवणे, फ्रिज, एअर कंडीशन दुरूस्ती, लोखंडी आणि लाकडी फर्निचर बनवणे, प्लास्टिकच्या वस्तू बनवणे, बांधकाम विषयक कामे, इमारत दुरुस्ती, ड्रॉईंग, साईन बोर्ड, होर्डिंग, फलक, इंटिरिअर डिझाईन, टीव्ही, रेडिओ, हार्डवेअर, संगणक दुरुस्ती, प्रिंटरची दुरुस्ती देखभाल, फिजिओथेरपी आणि डेटा इंट्री अशा ८१ पेक्षा अधिक कामांचा यामध्ये समावेश केला आहे.

विद्यार्थ्यांनी केलेले प्रत्येक काम नागरिकांपर्यंत पोहोचावे यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या उत्पादनासाठी संचालनालयाकडून ‘महास्किल’ या नावाने ब्रँडिंग करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र बोधचिन्ह सुद्धा बनवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची ही उत्पादने खाजगी व सरकारी आस्थापनांकडून स्वीकारली जाणार आहेत. यातून मिळणार्‍या उत्पन्नातील वाटा विद्यार्थ्यांसोबतच त्यांना प्रशिक्षण देणारे शिक्षक आणि संस्थानाही मिळणार आहे. उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेसाठी आयटीआयमधील प्राचार्‍यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची स्थापन केली जाणार आहे. ही योजना राबवण्याची जबाबदारी प्राचार्य व कार्यकारी समितीवर सोपवली आहे.

उत्पादनाभिमुख प्रशिक्षण योजनेमुळे विद्यार्थ्याच्या प्रात्यक्षिक, कौशल्यात वाढ होईल. ‘महास्किल’ ब्रँडमुळे त्यांना शिक्षण घेतानाच औद्योगिक व अन्य आस्थापनातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमासोबतच कौशल्य विकसित होईल.
– दिगंबर दळवी, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

Related posts

किशोर/किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर

Voice of Eastern

साताऱ्यातील मूळगाव वाळणे येथील पुरातन उत्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

एक वर्षाच्या काळात घेतले लोकाभिमुख निर्णय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Comment