Voice of Eastern

मुंबई

मुस्लिम विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी असलेल्या यूपीएससी निवासी मार्गदर्शन केंद्रात राहत असलेल्या ३० विद्यार्थ्यांना हज हाऊस समितीने तडकाफडकी घरी पाठवले. विद्यार्थ्यांना एक दिवसांची आगाऊ नोटीस देऊन त्यांना हज हाऊस मोकळे करण्याचे फर्मान हज समितीने दिले आहे. त्यामुळे मुस्लिम विद्यार्थी संघटनांकडून हज हाऊसच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मुस्लिम उमेदवारांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे कमी असलेले प्रमाण आणि शासकीय सेवेतील त्यांचे कमी असलेले प्रमाण वाढवण्यासाठी हज हाऊस यूपीएससी कोचिंग इन्स्टिट्यूटची स्थापना केली होती. या केंद्रामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेसंदर्भातील सर्व प्रकारचे मार्गदर्शन हज हाऊसकडून पुरवण्यात येते. हज हाऊसकडू दरवर्षी संपूर्ण राज्यातून विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवते. त्यांची परीक्षा घेऊन निवड झालेल्या १०० विद्यार्थ्यांना दरवर्षी हज हाऊसकडून प्रशिक्षण दिले जाते. त्यांनतर या विद्यार्थ्यांना घरी पाठवले जाते. यामध्ये ज्या विद्यार्थ्याची यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला निवड झाल्यास त्यांना पुन्हा तीन ते चार महिने हज हाऊसमध्ये राहण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे दरवर्षी नवनवीन विद्यार्थी हज हाऊसमध्ये प्रशिक्षणासाठी येतात. हज हाऊसमध्ये २१० विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. यामध्ये नवीन आलेले १०० विद्यार्थी, गुणवत्ताधारक ५० विद्यार्थी आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी असे वर्गीकरण आहे. मात्र हज हाऊसच्या समितीने फक्त नवीन येणार्‍या १०० विद्यार्थ्यांची व्यवस्था करत मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या ३० विद्यार्थ्यांची १७ जानेवारीला परीक्षा झाल्यानंतर त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. हज हाऊसमध्ये या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन झाले असते. मात्र हज हाऊस समितीने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे.

मागील तीन ते चार वर्षांपासून हज हाऊसमध्ये ठाण मांडून बसलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही घरी पाठवले आहे. हज हाऊसमध्ये दरवर्षी १०० नवे विद्यार्थी येतात. जुने विद्यार्थी ठाण मांडून असल्याने नवीन येणार्‍या विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळावे, यासाठी या विद्यार्थ्यांना आम्ही घरी जाण्यास सांगितले.
– याकूब शेख, सीईओ, हज हाऊस समिती

Related posts

म्हाडा सरळ सेवा भरती : रेल्वे रिक्रूटमेन्ट बोर्ड परीक्षेच्या उमेदवारांची १६ व १७ जूनला होणार पडताळणी

…म्हणून तिने मारले पोलीस बाबाला

Voice of Eastern

शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संख्येत घट नाही

Voice of Eastern

Leave a Comment